देश-विदेश
-
राखावी बाबूंची अंतरे..
याआधीच्या वेतन आयोगांनी सरकारी तिजोरीवरला भार वाढवला… वाढू द्या! त्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा तर दिल्लीतील आचारसंहिताकाळात झाली… होऊ द्या! जात, धर्म, राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम, विचारधारा वगैरे हवा तापवायला ठीक. पण हल्ली कोणतीही निवडणूक मतदारांना आर्थिक लाभ दिल्याशिवाय जिंकता येत नाही हे लोकसभा, त्यापाठोपाठ झालेल्या महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झालेलेच आहे. तेव्हा दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकार जादूगाराप्रमाणे टोपीतून…
Read More » -
खूशखबर… येतोय आठवा वेतन आयोग आयोग गठित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांसाठी ८व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यास गुरुवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली. संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारक यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ होऊन त्यांच्या वेतन व भत्त्यांत घसघशीत वाढ होईल. माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ८व्या वेतन आयोगाच्या…
Read More » -
दिल्ली विधानसभा निवडणूक आता दिल्लीचा नंबरः ५ फेब्रुवारीला मतदान, ८ ला निकाल
नवी दिल्ली । दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगूल मंगळवारी वाजला. एकूण ७० जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होईल. ८ फेब्रुवारीला निकाल येईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, २ लाख मतदार असून १२ मतदारसंघ राखीव आहेत. ईव्हीएम हॅकच्या आरोपांवर ते म्हणाले ‘ते हॅक होऊ शकत नाही, असे न्यायालयांनी ४२ वेळा सांगितले. आम्ही प्रत्येक मतदारसंघातील ५ व्हीव्हीपॅटची मोजणी करतो. आतापर्यंत ६७,००० व्हीव्हीपॅट तपासल्या.…
Read More » -
‘एक निवडणूक’ विधेयक उद्या मांडणार विधानसभा असलेल्या तीन केंद्रशासित प्रदेशांनाही लागू होणार
नवी दिल्ली: ‘एक देश, एकनिवडणूक’ या गोष्टीशी संबंधित 129 वी घटनादुरुस्ती विधेयक, केंद्रशासित प्रदेश कायदेविषयक दुरुस्ती विधेयक ही दोन विधेयके केंद्रीय विधिमंत्री अर्जुन मेघवाल येत्या सोमवारी (दि. 16) लोकसभेत मांडणार आहेत. लोकसभेसोबतच विधानसभांच्या राज्य निवडणुका एकत्रितरीत्या घेण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्याबैठकीत गुरुवारी (दि. 12) मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्याच्याशी संबंधित आणखी दोन…
Read More » -
एक देश एक निवडणूक, एक घटनात्मक ‘चकवा’!
लोकसभा व राज्यांमधील विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करणाऱ्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उच्चाधिकार समितीचा अहवाल बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारला. ‘एक देश एक निवडणूक‘ ह्या धोरणाची देशव्यापी चर्चेनंतर अंमलबजावणी करण्याचे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित आघाडी सरकारने ठरवले आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली, ‘एक देश एक निवडणूक‘ या शक्यतेची चाचपणी करण्यासाठी…
Read More » -
अग्रलेख : उजवा डावा!
वैचारिकतेच्या आणि कृतिशीलतेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांच्यातील साम्यवादी नेहमीच जागा राहिला; परंतु आपले साम्यवादी असणे त्यांनी कधी समोरच्यावर लादले नाही…. ‘‘मी वेद वाचलेले आहेत. पुराणे वाचलेली आहेत. विविध धर्मशास्त्रे वाचलेली आहेत आणि म्हणूनच मी साम्यवादी झालेलो आहे’’, असे ठासून सांगण्यासाठी आवश्यक बौद्धिक उंची आणि खोली असलेल्या सीताराम येचुरी यांच्या जाण्याने आपण नक्की काय गमावले हे कळण्यासाठीदेखील किमान गुणवत्ता हवी. एरवी ‘एक नेता…
Read More » -
सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा आदेश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना लागू करणे आवश्यक
नवी दिल्ली, 23 : देशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय जारी केला आहे. केंद्रीय मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचना‘ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालय कटिबद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पोक्सो कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मंत्रालयाने ‘शालेय सुरक्षा…
Read More » -
पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024
नवी दिल्ली, 22 : दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. ही प्रथा पुढे नेत यावर्षी ही पद्म पुरस्कारांची नामांकने, केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत प्रक्रिया 1 मे 2024 पासून प्रारंभ झाली असून, नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठीचे नामांकने (https://awards.gov.in). या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टवर ऑनलाईन सादर केली जातील पद्मविभूषण, पद्मभूषण, आणि पद्मश्री…
Read More » -
पीएम गतिशक्ति योजनेतर्गत नाशिकमधील मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्कसह सहा पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन
नवी दिल्ली 22 : पीएम गतिशक्ति योजनेच्या अंतर्गत नेटवर्क योजना गटाच्या (NPG) 77 व्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिकयेथील प्रस्तावित मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्कासह सहा महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. या प्रकल्पांमध्ये गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, आणि अंडमान आणि निकोबार द्वीपसमूहातील विविध प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील परिवहन क्षमतेत अधिक सुधारणा होईल,आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळू शकेल. पीएम गतिशक्ति…
Read More » -
11 लाख ‘लखपती दीदींना’ पंतप्रधान मोदींकडून प्रमाणपत्र 25 ऑगस्ट रोजी जळगावात सोहळा
नवी दिल्ली 23 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर राहणार आहेत. या दौ-या दरम्यान जळगाव येथे 11 लाख दिदींनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा सन्मान म्हणून, श्री. मोदी त्यांचा सत्कार करतील. ज्या कष्टाळू महिलांनी स्वबळावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपये कमवले आहेत व त्यांनी त्यांच्या कुटुबांला हातभार लावत, कुंटुंबियाना गरीबीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात मदत करुन, समाजात एक…
Read More »