राजकीय

भावना ताईंचा एकच निर्धार यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या विकासासाठी सौ.राजश्री ताई पाटील (महल्ले )यांनाच करा खासदार!!

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ प्रचाराच्या  निमित्ताने कळंबा-महाली ता. जि. वाशिम या गावात पद यात्रेनिमित्त खा.भावना ताई गवळी राजश्रीताई यांच्या प्रचारासाठी आल्या व गावकर्यांनी ढोलताश्याच्या गजरात, फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत राजश्रीताई व खा. भावना गवळी यांचे स्वागत केले.
ग्रामस्थांना संबोधित करताना खा. भावना ताई गवळी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो लोकप्रतिनीधी यवतमाळ मतदारसंघाला दिला आहे, त्यांना भावना ताईच उभ्या आहेत असे समजुन भरघोस मताने निवडुन द्या असे आवाहन केले.
तसेच खा. भावना गवळी प्रचारासाठी आल्याने आता एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशाचे नेतृत्व करताना देशाचे अनेक मोठे प्रश्न निकाली लावले असुन, देशासाठी मोदी साहेबच योग्य असल्याने ग्रामस्थांनी बहुमताने महायुतीला व राजश्रीताई यांना निवडुन देण्याचे आवाहन ही केले.यावेळी मनसे जिल्हाप्रमुख श्री.मनीष भाऊ डांगे, शिवसेना सर्कल प्रमुख श्री.दत्ताराव भालेराव, शिवसेना शहर प्रमुख श्री.अनसिंग रामेश्वर गोरे, भाजपा श्री.किशोर तुईकर, भाजपा श्री.अनिल भाऊ देशपांडे, भाजपा श्री.राजूभाऊ मानधने, भाजपा श्री.रामेश्वर कल्याणकर, भाजपा श्री.रामभाऊ अंकुशकर, भाजपा श्री.रविभाऊ पळसकर, प्र. उपा. रा. काँ. व जि.प.अ. वाशिम श्री.चंद्रकांत ठाकरे, भाजपा श्री.गजानन नवगनकर, भाजपा श्री.ज्ञानेश्वर ठोके, भाजपा श्री.साईनाथ वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस श्री.अनिल भाऊ गवळी, शिवसेना श्री.अनिल भाऊ ठाकरे, वि.हिंदू.प कार्यकर्ते श्री.पवन भालेराव, वि.हिंदू.प.कार्यकर्ते श्री.रमेश पुरी, बजरंग दल श्री.गिरीधर गीरे, बजरंग दल श्री.विनोद गाबळे,मनसे श्री.यश चाव्हाण, मनसे श्री.अमोल पोहकर, मनसे  श्री.अकश अमरावतकर,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री.संजय भाऊ मापारी ,प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श्री.पवन भाऊ राऊत,वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री.सुभाष भाऊ चौधरी, पंचायत समिती सदस्य वाशिम श्री.दीपक भाऊ खडसे,माजी सरपंच श्री.किसनरावजी महाले.तसेच महायुतीचे सर्व सदस्य व कार्यकर्ते, युवा वर्ग, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button