नांदेड
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन/ई-चालनाबाबत शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत
नांदेड दि. 12 डिसेंबर : प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड या कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन/ई-चालन यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार 14 डिसेंबर 2024 रोजी लोकअदालत आयोजीत केली आहे. सदरील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजीत केलेल्या लोकअदालतमध्ये वाहन चालक–मालक यांनी उपस्थित रहावे आणि तडजोड पद्धीतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा करावा. सर्वांनी या उपलब्ध सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

