नांदेड

रंगकर्मीच्या राज्य बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न; तसीलदार राम बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन

उदगीर (प्रतिनिधी) रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठाण उदगीर आयोजित भव्य राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी राज्यभरारातील 25 जिल्हातील तसेच महाराष्ट्र शेजारील राज्यातून खेळाडू सहभागी झाले होते .                                          स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार राम बोरगावकर,रामचंद्र तिरुके,प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के,अॅड.एसटी पाटील,रामप्रसाद लाखोटीया रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड,केंद्रप्रमुख बालाजी भोसले डॉ.विजय बिराजदार प्रा महेश हुलसुरे यांची उपस्थिती होती.सदर स्पर्धा साठी महाराष्ट्रातील 25 जिल्हातील जवळपास 200 पेक्षा जास्त खेळाडू यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये खुला दुहेरी,35+वयोगटातील खुला दुहेरी व खुला एकेरी अश्या तीन गटात सदर सामने झाले.

आतिशय चूरशीच्या झालेल्या सामन्यात खुला दुहेरी गटात प्रथम क्रमांक-मोहम्मद फिरोज,सुनिल भाभीबानी(गुलबर्गा)
द्वितीय-चेतन माने,परीक्षित पतंगराय(नांदेड) तर तृतीय-गणेश सकपा, तेजस खोमणे(सातारा) त्याचबरोबर 35+ वयोगटातील खुला दुहेरी गटात प्रथम गातात -संतोष कदम,संदिपसिंह जोहार(नांदेड)द्वितीय गटात-नितीन गाढवे,राकेश पेठारे(सांगली) तृतीय गटात -संतोष स्वामी,सचिन चौधरी(नांदेड),खुला एकेरी गटात -प्रथम मोहमद फिरोज (गुलाबर्गा)
द्वितीय -तेजस खोमणे बारामती,तृतीय -सुजल शिरशीकर. लातूर यांनी पटकवला उपस्थित बक्षीसपात्र खेळाडूंना विनीत पाटील (शिवम रिसोर्ट, ब्रुकलेन अॅक्चा, उदगीर)महेश हुलसुरे,अमर सोनटक्के (श्रीकृष्णा प्लायवूड, उदगीर / लातूर)अक्षय वाघमारे (ब्रेड अँड ब्राऊनी, उदगीर)
वसंत बलांडे (आनंद डेंन्टल क्लिनिक, उदगीर)डॉ.नागनाथ कवडगावे (पमा सिटीकेअर अँड अतिदक्षता कक्ष, उदगीर)विजय बिराजदार (सुमंगल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, उदगीर)
वैभव सोनटक्के (चार्टेड अकाउंटन्ट, उदगीर) यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.बक्षीस पात्र खेळाडूंना रोख रक्कम,आकर्षक ट्रॉफी,व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे मुख्य आयोजक मारोती भोसले ,सोहम पेन्सलवार,बालाजी भोसले,सोनू गुरधाळक,ओम पवार,नितीन कल्याणकर,अक्षय,बबलू बिरादार,करण फड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button