नांदेड

प्रतापरावला बरोबरीच्या राजकीय प्रवासात पाठवा- आमदार हेमंत पाटील – कलंबर येथे स्नेहमिलन मेळावा, * आता बेरजेचे राजकारण करण्याचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

नांदेड : मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र व संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कलंबर येथे नांदेड दक्षिण व लोहा-कंधार विधानसभा मतदार संघाच्या सीमेवर स्नेहमिलन मेळावा 15 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आला. याप्रसंगी आमदार हेमंत पाटील यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर व माझा राजकीय प्रवास 2009 पासून सोबतच सुरू झाला. आता मी कॅबिनेट मंत्री व आमदार असून माझ्यासोबतच्या राजकीय प्रवासाला प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पाठविण्याचे आवाहन आ.हेमंत पाटील यांनी मतदारांना केले.

        नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा निवडणूक अनुषंगाने, संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कलंबर येथे नांदेड दक्षिण शिवसेना महायुतीचे उमेदवार आनंदराव तिडके पाटील व लोहा-कंधार मतदार संघाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आले होते. याप्रसंगी  खासदार श्रीकांत शिंदे यांनी मा.खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व आ.हेमंत पाटील यांच्यातील 2019 च्या निवडणुकीतील कटूता विसरण्यासाठी पुढाकार घेत त्यांना एकाच व्यासपीठावर आणले. तसेच नांदेड जिल्हयातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास नांदेड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसून सिंचनाचाही प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी दोन्ही विधानसभा मतदार संघातील 10,000 लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता.

पोफाळी प्रमाणे ऊसाला 2600 रु.भाव देऊ – विदर्भातील पोफाळी येथील साखर कारखाना सुरु केला असून ऊसाला 2600 रु.भाव दिला आहे. त्याचप्रमाणे मराठवाडयातील मागील 22 वर्षापासून बंद असलेला कलंबर येथील साखर कारखाना लवकरात लवकर सुरु करुन या भागातील शेतक-यांच्या ऊसाला पोफाळी साखर कारखान्याप्रमाणे 2600 रु.भाव देवून या भागातील शेतक-यांना सोन्याचे दिवस आणणार असल्याचे आ.हेमंत पाटील व मा.खा.प्रतापराव पाटील यांनी सांगितले.

   आनंद पाटील तिडके बोंढारकर यांना मोठया मताधिक्याने निवडून दया

–  2014 च्या नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीत मी प्रतापराव पाटील यांच्यामूळे आमदार झालो याची कबुली आ.हेमंत पाटील यांनी मोठ्या मनाने दिली. यानंतर कलंबर साखर कारखान्यावरुन थोडे मतभेद झाले मात्र आता सर्व विसरून बेरजेचे राजकारण करण्यासाठी मी दोन पावले मागे आलो. त्याचप्रमाणे प्रतापराव पाटील यांनी देखील बेरजेच्या राजकारण करण्यासाठी पुढाकार घ्यावा व आनंद पाटील तिडके बोंढारकर यांना निवडून आणण्यासाठी बळ दयावे असे आ.हेमंत पाटील यांनी सांगितले.

            – 2019 च्या नांदेड विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार आ.हेमंत पाटील यांच्या पत्नी सौ.राजश्री हेमंत पाटील यांच्या विरोधात प्रचार करुन त्यांनी दिलीप कंदकूर्ते यांना साथ दिली होती. मात्र आता सर्वसामान्यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या शिवसेना युतीचे उमेदवार आनंद पाटील तिडके बोंढारकर या शेतकरी पुत्राला मोठया मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन मा.खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मतदारांना केले.

Related Articles

Back to top button