माहूर
-
अध्ययन, संस्कार व कलाविष्कार त्रिवेणीचा संगमातून शालेय जीवन फुलते : आ. केराम
माहूर(सरफराज दोसानी):- कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विकासाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. फक्त त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. अध्ययन, संस्कार व कलाविष्कार त्रिवेणीचा संगमातून शालेय जीवन फुलते. त्याबरोबरच व्यक्तिमत्व विकासासाठी हे क्षेत्र अतिशय उपयुक्त आहे. जिनियस इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाखाणण्याजोगा असून आपण स्नेहसंमेलन निमित्ताने प्राप्त झालेल्या व्यासपीठाचा विधायक उपयोग करून घ्या, असे मत आमदार भीमराव…
Read More » -
वृक्ष वाटप,संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा -आमदार भीमराव केराम
किनवट – वातावरणात होणारे अनपेक्षित बदल पाहाता वाढदिवस व अन्य औचित्याने वृक्ष वाटप, लागवड आणि संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन आ.भीमराव केराम यांनी बुधवारी दि.२९ रोजी केले. भाजपचे…
Read More » -
रिक्त पोलीस कर्मचारीपदांचा अनुशेष तातडीने भरावा मुख्यमंत्र्यांकडे आ. केराम यांची मागणी
किनवट,दि.28 (प्रतिनिधी) : किनवट व माहूर या दोन्ही तालुक्यात कार्यरत असलेल्या 5 पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. अपुऱ्या संख्याबळामुळे कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत होत असल्याची बाब लक्षात घेऊन, आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्याची मागणी केली आहे. लोकसंख्या व भौगोलिक दृष्टीने…
Read More » -
लोकहितासाठी राज्य मार्ग 51 ला राष्ट्रीय महामार्गात दर्जोन्नत करा व रखडलेला राष्ट्रीय महामार्ग 161 अ त्वरित पूर्ण करा
किनवट,दि.24 (प्रतिनिधी) : ना.नितीन गडकरी यांनी 2017 साली माहूर येथील जाहीर सभेत आश्वासन दिल्याप्रमाणे, किनवट मतदार संघातील माहूर-सारखणी-मांडवी- आदिलाबाद राज्य मार्ग 51 या आंतरराज्यीय रस्त्यास राष्ट्रीय महामार्ग घोषित करून, त्याच्या दर्जोन्नतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच गत सहा-सात वर्षापासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग 161 अ चे काम व किनवट बाह्य वळणरस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी आ.भीमराव केराम यांनी नागपूर येथे केंद्रीय…
Read More » -
लोकप्रतिनिधीच्या सूचना गांभीर्याने न घेणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही – आ.भीमराव केराम
किनवट – सर्वसामान्यांच्या विकासासाठी सरकार काम करीत असताना लोकप्रतिनिधीच्या सूचना गांभीर्याने न घेणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही,असा सज्जड इशारा आ.भीमराव केराम यांनी मंगळवारी दि.२१ तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिला. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आ.केराम यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मेघना कावली,किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर,माहूरचे तहसीलदार किशोर यादव, किनवटचे मुख्याधिकारी डॉ.अजय…
Read More » -
नांदेड – पुणेसह नंदीग्राम एक्सप्रेसचा विस्तार करा – सुधाकर भोयर
किनवट – किनवट – माहूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नांदेड – पुणे गाडीचा आदिलाबादपर्यंत तसेच नंदीग्राम एक्स्प्रेसचाही पुण्यापर्यंत विस्तार करावा,अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सुधाकर भोयर यांनी केली आहे. …
Read More » -
” शासनाच्या अन्य मराठी साहित्य संमेलन योजनेअंतर्गत जिल्ह्यात होणार मराठी भाषेचा जागर. “
किनवट… गेल्या अनेक दशकापासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ द्वारा अनेक जन उपयोगी उपक्रम राबविले जातात. साहित्य..संस्कृती ही वृद्धिंगत झाली पाहिजे, प्राचीन व नवीन ग्रंथ प्रकाशित झाले पाहिजेत लेखकांना बळ मिळाले पाहिजे त्यांच्या पहिल्या साहित्यकृतीला अनुदान देत साहित्यकृती प्रकाशित करण्याचाही प्रयत्न साहित्य संस्कृती मंडळ दरवर्षी करते . दरवर्षी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार यांच्या नावाने विविध प्रकारातील लेखनाला…
Read More » -
भाजप सदस्यता महाअभियानात पहिल्या दिवशी २२०० सदस्यांची नोंदणी किनवट विधानसभेसाठी पक्षाने ५० हजारांचे दिले उद्दिष्ट
किनवट, संपूर्ण राज्यात भाजपाचे रविवारी (दि. पाच) विशेष सदस्यता महाअभियानास सुरुवात झाली असून, त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून किनवट विधानसभा क्षेत्रामध्ये रविवारी शहरातील छत्रपती शिवाजी चौक, जिजामाता चौक, बालाजी मंदिर चौक, बसस्थानक चौक व सरस्वती विद्या मंदिर परिसर या पाच ठिकाणी मंडप उभारून या राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी या सर्व ठिकाणी आ. भीमराव केराम यांनी फीत…
Read More » -
प्रदीप नाईक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; आजी – माजी मंत्र्यांसह मान्यवरांची हजेरी
किनवट – येथील माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पार्थिवावर गुरुवारी दि.२ दहेली तांडा येथे आजी – माजी मंत्री,खासदार,आमदारांसह हजारोंच्या जनसमुदायात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. किनवट – माहूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.प्रदीप नाईक यांचे बुधवारी…
Read More » -
कर्तृत्ववान लोकनेते काळाच्या पडद्याआड
किनवट/ किनवट माहूर विधानसभा क्षेत्राचे सलग तीन वेळा आमदार राहिलेले प्रदीप नाईल यांचेहैदराबाद येथे १ आनेवारी रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान हृदयविकाराच्या ती झटक्याने वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. बहेली तांडा येथे त्यांचा लक्ष्मीपूजनच्या दिवशी जन्म झाला होता. काही वर्ष ते तेलंगणातील आदिलाबाद येथे व्यवसाय केला. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम १९९९ ची किनवट माहूर विधानसभालढविली. त्यात त्यांचा पराभव झाता …
Read More »