माहूर

लाभार्थ्यांनी आधार बँकेशी लिंक करावे-यादव

माहूर / प्रतिनिधी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ व इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना अनुदानाचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचे अनुदान यापुढे आता डीबीटीच्या माध्यमातुन वितरित करण्यात येणार असल्याने सर्व लाभार्थ्यांनी आपले बँकखाते आधारकार्डाशी लिंक करून घ्यावे असे आवाहन तहसिलदार किशोर यादव यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या पत्रानुसार सर्व लाभार्थ्यांना एप्रिल २०२४ पासून महा डीबीटी द्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावे. आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत व मोबाईल नंबर तहसिल कार्यालयात किंवा आपल्या तलाठी सज्जाकडे ३१ मे २४ पर्यंत सादर करावेत, सदर माहिती सादर न केल्यास एप्रिल २४ पासुन लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करणे व मोबाईल नंबर असणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत सर्व लाभार्थ्यांनी आपले सर्व कागदपत्र सादर करावेत असे तहसीलदार किशोर यादव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

अनुदान मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी बँकखाते आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक एप्रिल महिन्यापासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या ( डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर) माध्यमातून वितरित केले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थी यांच्या ज्या बँकखात्यात अनुदान जमा होते त्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी आधारकार्ड (लिंक) संलग्न असणे गरजेचे आहे. जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर संबंधीत लाभार्थी यांना एप्रिलचे अनुदान मिळणार नाही व त्यासाठी लाभार्थी स्वतः जबाबदार असणार आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले बँकखाते आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे.

Related Articles

Back to top button