किनवटमाहूर

आ.केराम यांना पुन्हा उमेदवारी ; किनवटमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

किनवट – भाजप महायुतीच्यावतीने किनवट – माहूर विधानसभेसाठी पुन्हा एकदा आ.भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.                                                                                                                                         भाजपच्या पहिल्या यादीत आ.भीमराव केराम यांचे नाव जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या जिजामाता चौकात फटाक्यांची आतिषबाजी केली.भाजप पक्षश्रेष्ठीने माझ्या कार्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा मला उमेदवारी दिली.याबद्दल मी पक्षश्रेष्ठीचे आभार मानतो.उमेदवारी मिळविण्याची परीक्षा आपण पास झालो,आता मतदारांच्या आशीर्वादाने निवडणूकही जिंकू,असा विश्वास आ.भीमराव केराम यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.

Related Articles

Back to top button