Uncategorized

उनकेश्वर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव व भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन ​आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते होणार उद्घाटन; १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल

श्रीक्षेत्र उनकेश्वर :- किनवट तालुक्यातील तीर्थक्षेत्र उनकेश्वर येथे ‘श्री गुरुदेव अध्यात्म ज्ञानयोग साधना महायज्ञ चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ब्रं.वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी स्मरण, सर्व संत स्मृतिदिन महोत्सव आणि भव्य भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. १८ फेब्रुवारी ते शुक्रवार दि. २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा महोत्सव अध्यात्म ज्ञानयोग साधना आश्रम, उनकेश्वर येथे संपन्न होणार असुन या महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे.

एक दिवसीय भव्य खंजेरी​ स्पर्धा कार्यक्रमाचे सकाळी १० वा.उद्घाटन लोकप्रिय आमदार मा. श्री. भीमरावजी केराम यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान घाटंजीचे सेवाधिकारी अनंतरावजी काटकोजवार भूषविणार आहेत.तर प्रमुख पाहुणे गणेश धर्माळे सर पुसर, प्रा.खैरे पुसद,प्रा. लागणे पुसद, विठ्ठल देशमवाड आदेगांव, एकनाथ गावत्रे करंजी, परमेश्वर इंगळे हिमायतनगर, कवटकर गुरुजी पुसद, माणिक एंचलवार आदिलाबाद (तेलंगणा ), शारदासुत खामकर पोलीस माहूर, गोविंद पाटील टेंभी, भगवान पाटील चिंचखेड, हे उपस्थित राहणार आहे.’महोत्सवात
​दैनंदिन उपक्रम: पहाटे ५ ते ६ वाजेपर्यंत ध्यानधारणा, सकाळी ६ ते ७ वा.योगासन आणि स. ७ ते ८ वा. पर्यंत ग्रामस्वच्छतेचा उपक्रम राबविला जाईल.
​१८ फेब्रुवारी: सकाळी ९ ते १० गोपाळराव महाराज मुरझळेकर यांचे ग्रामगीतेवर प्रवचन, त्यानंतर सकाळी १० वाजेपासून एक दिवसीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेला सुरुवात होईल.
​१९ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दु. १२ पर्यंत ग्रामगतितेवर माणिकराव एंचलवार यांचे प्रवचन, दु. १२ते १ प्रा. ताराचंद्र कंठाळे यांचे सामुदायिक प्रार्थनेवर व्याख्यान, दु. २ ते ३ छ.शिवाजी महाराज जयंती निमित्त ह.भ.प. नंदकिशोरजी गिरी महाराज यांचे विशेष व्याख्यान होईल.दु.३ ते ४ ह.भ.प. शारदासुत खामनकर यांचे सर्व धर्मिय प्रार्थनेवर प्रवचन, दु.४ ते ४:३० सर्वधर्मिय प्रार्थना इस्लाम धर्माची ह. मौलाना हुसेन वाई बा., बौद्ध धर्माची सुभाष खडसे वाई बा., ख्रिश्चन धर्माची सिस्टर आयरीन दिव्य ज्योती मांडवी, शिख, जैन, वैदिक धर्माची नंदकिशोर गिरी महाराज हे प्रार्थना करणार आहे.व मौन श्रद्धांजली ४:५८ वा.अर्पण केली जाईल. सां. ६ ते ७ सामुदायीक प्रार्थना,या सामुदायीक प्रार्थनेवर रामदास देशमुख केंद्रीय स. सेवाधिकार सेवाधिकारी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी यांचे चिंतन,रात्री ८ वा. ह.भ.प. ज्ञानेश्वर केसाळे महाराज यांचे ग्रामगीतेवर ‘राष्ट्रीय कीर्तन’ होईल.
​२० फेब्रुवारी: सकाळी ७ वा.ग्रामस्वच्छता नंतर लगेच रामधुन फेरी तसेच रांगोळी स्पर्धा आणि सकाळी ११ ते १२:३० या वेळेत व्यसनमुक्ती सम्राट ह.भ.प. मधुकर खोडे महाराज ‘काल्याचे कीर्तन’ होऊन महोत्सवाची सांगता होईल. दुपारी १ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
​भजन स्पर्धेतील विजेत्यांसाठी खालीलप्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत:​ प्रथम बक्षीस: ११,१११/- रुपये (अध्यात्म ज्ञानयोग साधना ट्रस्टतर्फे),​ द्वितीय बक्षीस: ७,७७७/- रुपये (पुंडलीकराव गेडाम, सरपंच तर्फे), तृतीय बक्षीस: ५,५५५/- रुपये (अनुसयाबाई बाबुसिंग चव्हाण तर्फे),​ चतुर्थ बक्षीस: ३,३३३/- रुपये (श्याम सुंदर शहारे, उपसरपंच तर्फे),​ पाचवे बक्षीस: २,२२१/- रुपये ( देवरावजी गेडाम तर्फे) भजन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी नाव नोंदणीसाठी श्याम शहारे (९१४५४४४५४८) किंवा संतोष कडलवार (८३८०८२५६३२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून तीन दिवस राहण्याची व अल्पोपहार, भोजनाची व्यवस्था केली असून या महोत्सवाला मराठवाडा, तेलंगणा, विदर्भातुन हजारो साधक येणार असून जास्तीत जास्त साधकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे अ.ज्ञा. यो. सा. सेवाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष लच्छमारेड्डी यल्टीवार, अध्यक्ष बाबाराव केशवे, उपाध्यक्ष, किशन पवार, कोषध्यक्ष, ज्ञानेश्वर जाधव, सचिव, पुंडलिक घोडाम, शिवराम पाटील, भीमराव पवार, नंदकिशोर गिरी, प्रेमसिंग राठोड, शिवा कोंडबाराव खोकले व समस्त श्रीगुरुदेव भक्तांनी केले आहे.

Related Articles

Back to top button