Uncategorized
किनवट लॉयन्स क्लबच्यावतीने स्मरणशक्ती वाढीसाठी मार्गदर्शन शिबिर

किनवट – विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती दुप्पट कशी करावी,यासाठी किनवट लॉयन्स क्लब गोल्डच्यावतीने रविवारी दि. २० शहरातील श्रीराम मंदिर सभागृहात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्कील अँड मेमरीचे प्रशिक्षण दिलेले प्रशिक्षक एस.भास्कर यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना एकूण ४ सत्रात मार्गदर्शन केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष श्रीधर नेम्मानीवार यांच्यासह पदाधिकारी अभय महाजन,गौरव इटकेपेल्लीवार,निशांत चाडावार, व्यंकट नेम्मानीवार,सुनील आयनेनीवार,राजेंद्र चाडावार,डॉ.सुरेंद्र जन्नावार,व्यंकटेश कंचर्लावार आदींनी प्रयत्न केले.



