Uncategorized

महसूल विभागाचा ‘अवैध वाळू माफिया’वर धडक कारवाई; तीन ट्रॅक्टर जप्त

किनवटात महसूल विभागाचा ‘वाळू माफिया’वर धडक हल्ला

किनवट, दि. 07 जानेवारी 2026 (प्रतिनिधी): किनवट तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने धडक कारवाई करत तीन ट्रॅक्टर–ट्रॉली जप्त केल्या. सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्र दोंन्तुला आणि तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दि. 07 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास मौजे सावरी, ता. किनवट येथे विना परवाना रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर–ट्रॉली पकडले गेले. कारवाईदरम्यान वाहनचालकांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांना पाचारण होताच ते घटनास्थळावरून पळून गेले. मात्र ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी तत्परता व धैर्य दाखवत कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
जप्त केलेली वाहने पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालय, किनवट येथे जमा करण्यात आली आहेत. या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी वासुदेव तायडे, दीपक पडोळे, संतोष बल्लाळ, विश्वास फड, हरीश यादव, आदिनाथ डुकरे, श्रीनिवास रेड्डीवार, अक्षय महल्ले, अजय लहानकर, रामदास शेडगे, विक्रम चौधरी, महसूल सेवक गजानन तरपे, संतोष बिल्लोलवार, एस. ए. हंबर्डे यांसह पोलीस निरीक्षक गणेश कराड व पोलीस कर्मचारी आर. एस. डुकरे यांनी सहभाग घेतला.
सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्र दोंन्तुला आणि तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी सांगितले की, अवैध वाळू उत्खनन व वाहतूक थांबवण्यासाठी महसूल प्रशासनाकडून यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. या कारवाईत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या कर्मचाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले.

Related Articles

Back to top button