आमदार हेमंत पाटील यांच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्य शिधा वाटप

नांदेड ता.(३१ ) शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा ( हळद ) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त गरजूना एका कुटुंबाला पाच दिवस पुरेल एवढ्या अन्नधान्य शिधा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार आनंदराव पाटील बोंढारकर,जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे,तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे,उपजिल्हाप्रमुख बिल्लू यादव, जिल्हासंघटक शंकर पिनोजी,शहरप्रमुख तुलजेश यादव,सुहास खराणे पाटील,स्वराज यादव,सुदिन बागल,रवि थोरात यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण या शिकवणीनुसार सामाजिक भान जपत आजवर शिवसेना पक्ष सामाजिक कार्यात आपला हातभार लावून समाजातील गोर गरीब जनतेला नेहमीच आधार देण्याचे कार्य करत आला आहे. मागील काही दिवसात नांदेड जिल्ह्यात व संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस होऊन अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पुरामुळे शेतीचे व जनावरांचे अतोनात नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात लोकांचे राहते घर आणि जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्याची नासाडी झाली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यात सर्वत्र भयावय परिस्थिती निर्माण झाली असून शासन आपल्या परीने मदत करत आहे. परंतु अश्या गरजेच्या वेळी आमदार हेमंत पाटील हे सामाजिक भान जपत तात्काळ पुरग्रस्तांच्या भेटीला धावून गेले. पडत्या पावसात त्यांनी पुरग्रस्त भागाला भेटी देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांना नुकसान भरपाई आणि तातडीची मदत देण्यात यावी यासाठी प्रशासनाला निर्देश तर दिले. पण एवढयावरच न थांबता त्यांनी स्वखर्चाने पूरग्रस्तांना एका कुटुंबाला पाच दिवस पुरेल इतके अन्नधान्य शिधा किटचे वाटप केले. यामुळे तांदूळ, तूरदाळ, तेल,साखर, पीठ, मिरची पावडर, मीठ, यासह मसाले आदी साहित्य देण्यात आले. सामाजिक भान जपत केलेल्या या कामामुळे काही प्रमाणात का होईना पुरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. शिधा किट घेताना प्रत्येक पुरग्रस्ताच्या डोळ्यात आनंद अश्रू दिसत होते.



