गोकुंद्यात अनेक वर्षापासून रस्त्याचे काम रखडले ; आज उपोषणाचा तिसरा दिवस संभाजी ब्रिगेड व पॅंथर पाँवर ऑटो संघटनेचा उपोषणास पाठिंबा

किनवट : राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१-अ (NH-161A) वरील भोकर ते धनोडा दरम्यान गोकुंदा हद्दीत येणारा सेंट मेरीज स्कूल ते बाळासाहेब ठाकरे चौक आणि तेथून पुढे पेट्रोल पंपा पर्यंतचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या तात्काळ दुरुस्ती व बांधकामाच्या मागणीसाठी गोकुंदा येथील जेष्ठ शिवसैनिक मारोती सुंकलवाड यांनी दि. १८ मार्च पासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
भोकर ते धनोडा या राष्ट्रीय महामार्गावरील गोकुंद्यात अनेक वर्षापासून सेंट मेरीज स्कूल पासून बाळासाहेब ठाकरे चौक ते पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता अनेक वर्षापासून दूरअवस्थेत आहे.या महामार्गावरील अपघातांची संख्या वाढली असून सदर रस्त्याचे काम अनेक दिवसापासून रखडले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून धुळीचे प्रमाण वाढले आहे.विशेषता शालेय विद्यार्थी रुग्णवाहिका व दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे.
या रास्त मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मारोती सूंकलवाड यांच्या उपोषणास संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा सचिव बालाजी पाटील सिरसाट तालुकाध्यक्ष सचिन कदम शहराध्यक्ष सुमित माने प्रसिद्धी प्रमुख आकाश इंगोले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.तर पॅथर पॉवर ऑटो संघटनेच्या वतीने दि.२०- मार्च रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत ठाकरे चौक येथे रास्तारोको करण्यासंदर्भात ऑटो संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर शेख नसीर शे.महेबूब, अशोक राशलवार, शेख खयुब,अनिल भरणे,आनंद माने,फिरदोस खान,वसीम खान,मधुकर हलवले आदींच्या साक्षऱ्या आहेत.



