Uncategorized

मा. ना. हेमंतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किनवट येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

किनवट | प्रतिनिधी : मा. ना. हेमंतभाऊ पाटील, विधान परिषद गटनेते तथा अध्यक्ष स्व. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र, महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त किनवट येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेतील मुलांच्या गटात सुजित राठोड यांनी प्रथम क्रमांक, योगेश राठोड यांनी द्वितीय क्रमांक तर अरविंद जललवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर मुलींच्या गटात स्वाती राठोड यांनी प्रथम, पायल चव्हाण यांनी द्वितीय तर अश्विनी आडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील मुरकुटे, गजानन कोल्हे पाटील, शहरप्रमुख सुरज सातूरवार, मारुती सुंकलवाड, कपिल रेड्डी, सुरेश घुमडवार, शेख अफसर, विक्रांत दुगलवार, शेख जमीर, शेख अजीज, गजानन महाजन यांच्यासह अनेक शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. युवकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती व क्रीडाविषयक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन बालाजी पाटील मुरकुटे, शिवसेना तालुकाप्रमुख, किनवट यांच्या पुढाकाराने यशस्वीरीत्या पार पडले.

Related Articles

Back to top button