Uncategorized

भाजपाच्या राज्य परिषदेवर मच्छेवार यांची नियुक्ती

किनवट (वार्ताहर) -भाजपा संघटन शतप्रतिशत मजबूत आणि विस्तार या ध्येय-धोरणाखाली महाराष्ट्र भाजपा राज्य परिषदेवर राज्यात ४५४ सदस्य नियुक्त केले असून, नांदेड जिल्ह्यातून केवळ तीन सदस्य आहेत. किनवट नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे भाजपासह सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. राज्य पातळीवर स्थान दिल्याबद्दल मच्छेवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आ. भीमराव केराम यांचे आभार व्यक्त केले. पक्षाने सोपविलेली जबाबदारी अगदी विश्वासपूर्ण पार पाडण्याची ग्वाही त्यांनी दिली.
आगामी नगर पंचायती, नगर परिषदा, जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसह ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या सार्वत्रिक
पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य भाजपाने महाराष्ट्र भाजपा राज्य परिषदेची पुनर्बाधणी केली. किनवट या आदिवासीबहुल परंतु भाजपासाठी अग्रेसर ठरलेल्या किनवट भाजपातून माजी
नगराध्यक्ष आनंद मच्छेवारांना स्थान मिळाले हे विशेष. आ. भीमराव केराम यांचे खंदे समर्थक आणि भाजपाची संघटनात्मक मोर्चे बांधणीसाठी मच्छेवारांची कौशल्यपूर्ण
कामगिरी पहाता, किनवट या आदिवासीबहुल परंतु भाजपासाठी अग्रेसर ठरलेल्या किनवटभाजपातून माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवारांना स्थान मिळाले हे विशेष. महाराष्ट्र भाजपा श्रेष्ठींनी त्यांची दखल घेत मच्छेवारांना राज्य परिषदेवर घेतले.
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आ. भीमराव केराम यांचे मच्छेवारांनी आभार मानले. पक्षसंघटनांशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका हे मच्छेवारांच्या उद्दिष्ठपूर्तीचे लक्ष्य असणार आहे. त्यांचा राजकारणातील मागील अनुभव लक्षात घेता, या मतदारसंघावर भाजपाचेच वर्चस्व असेल.

Related Articles

Back to top button