Uncategorized

निधी वळविण्यास प्रतिबंध आणणारा कायदा करा: ‘सेक्युलर मुव्हमेंट,चे ॲड.मिलिंद सर्पे यांची मागणी

किनवट,दि.१३ : राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना, राज्यातील मागासवर्गीय तसेच विविध दुर्बल घटकांच्या विकासासाठी निधी जाहिर करण्यात येत असतो. यंदाच्या वर्षी चारशे पंचविस कोटी रूपयांचा अर्थसंकल्पात जाहिर केलेला समाज कल्याण खात्याचा निधी अन्य विभागाकडे वळविण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून निधी वळविण्याच्या अनेक घटना होत आहे. यामुळे सामाजिक कल्याण विभागाचा निधी इतरत्र वळविण्यास प्रतिबंध आणणारा कायदा करावा अशी मागणी ‘सेक्युलर मुव्हमेंट’, या संघटनेचे जिल्हा संघटक ॲड.मिलिंद सर्पे यांनी एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
निवेदनात नमुद केले आहे की, ‘समाज कल्याण खात्याचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात येतो. २०१४ पासून ते २०२० दरम्यान एसटी, एसटी मागास प्रवर्गाचे २५ हजार कोटी वळविण्यात आले. यामुळे समाजकल्याण विभागाचा निधी न वळविण्याचा कायदा करून अंमलबजावणी करावी.’

Related Articles

Back to top button