Uncategorized

गोदावरी कॉलेज ऑफ बँकिंगचा अनोखा शिवजन्मोत्सव सर्वांसाठी मार्गदर्शक गोदावरी कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

नांदेड : शिवाजी महाराजांच्या अंगी उत्तम प्रशासकाचे गुण असल्यामुळे आपल्या राज्यकारभारची घडी त्यांनी नीट बसवली होती. स्वराज्याच्या हितासाठी व लोककल्याणकारी राज्यासाठी अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून ते आपल्या कामाची विभागणी करून खाते प्रमुखांकडून उत्तम दर्जाचे काम करून घेण्यात त्यांची मजबूत पकड होती असे मत गोदावरी कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी सौरभ आग्रवाल यांनी व्यक्त केले.

गोदावरी कॉलेज ऑफ बँकिंगच्या संस्थापक राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून व संचालक अजय झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये इतिहासातील महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंगाचे चित्र व त्या घटनाप्रसंगाचा आढावा घेण्यात आला होता. याप्रंसगी शिवाजी महाराजांची वेशभूषा अथर्व रगटे तर जिजाऊंची वेशभूषा शुभश्री सूर्यवंशी यांनी केली होती. तसेच बाळराजे शिवबांचा पाळणा गौरी देशमुख, पोवाडा शिवचरण देवसरकर यांनी सादर केला तर प्रगती डुकरे, पूनम पिंपळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी वैष्णवी पाटील यांनी केले. तर सूत्रसंचलन रोहन शेंडगे आणि आभार पल्लवी सूर्यवंशी यांनी मानले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्कॉलर कॉमर्स अकादमी चे संचालक सौरभ अग्रवाल, प्राचार्या नेहा कुर्तडीकर, प्रशासकीय अधिकारी वैष्णवी प्रसाद पाटील, प्राध्यापक सुयोग मानवतकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button