Uncategorized

दुर्गम भागातील रुग्णसेवेची दखल; डॉ. अशोक बेलखोडे यांना फोर्ब्स इंडियाचा मानाचा पुरस्कार

‘We Serve India Season 3’ पुरस्काराने बेंगळुरूत गौरव; किनवटच्या शिरपेचात मानाचा तुरा

किनवट : किनवट तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात आपले संपूर्ण आयुष्य आरोग्यसेवेसाठी समर्पित करणारे डॉ. अशोक बेलखोडे यांना फोर्ब्स इंडियाच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘We Serve India Season 3’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेंगळुरू येथे नुकत्याच आयोजित विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बेलखोडे यांनी केलेले प्रदीर्घ कार्य, रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. अत्यंत दुर्गम भागात आरोग्यसेवेचे व्रत स्वीकारून त्यांनी केलेले कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

डॉ. अशोक बेलखोडे यांना फोर्ब्स इंडियाचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने किनवटच्या नावलौकिकात भर पडली आहे. त्यांच्या या यशाबद्दल आमदार भीमराव केराम, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button