भाजपाच्या भटके-विमुक्त प्रकोष्ठाच्या प्रदेश कार्यकारिणीत बाबुराव केंद्रे
प्रदेश कार्यकारिणीत विविध पदांवर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा; नव्या जबाबदाऱ्यांमुळे संघटन बळकटीला मिळणार चालना

नांदेड : भारतीय जनता पार्टीच्या भटके-विमुक्त प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बाबुराव (तुळशिराम) केंद्रे यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा भटके-विमुक्त मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र बाबुराव पवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रदेश सह-संयोजकपदी राजू साळुंके (रायगड), शिवाजी आव्हाड (ठाणे), पी. टी. चव्हाण (बीड), युवराज मोहिते (नाशिक), तुषार पोटे (अहिल्यानगर) आणि संगीता विठ्ठलराव खोत (सांगली) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी अमोल बावणे, राजेश धोत्रे (पुणे), बाबुराव (तुळशिराम) केंद्रे (नांदेड), अशोक वणवे (पुणे) आणि राहुल गावडे यांची नियुक्ती झाली आहे. राजेंद्र गोसावी यांची प्रदेश कार्यालय प्रमुखपदी, तर राज खैरनार यांची सह-कार्यालय प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष भोई यांच्याकडे प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, डॉ. संदीप वंजारी यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भटके-विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांना संघटनात्मक पातळीवर प्रभावीपणे मांडण्यासाठी तसेच राज्यभर पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.



