Uncategorized

माहूरमध्ये भाविकांसाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानींचा भव्य महाप्रसाद

स्व. आमदार प्रदीपजी नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५ क्विंटल मसाला भात व व्हेज बिर्याणीचे वाटप

माहूर : स्व. आमदार प्रदीपजी नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या पुढाकारातून भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुमारे ५ क्विंटल मसाला भात व व्हेज बिर्याणी तयार करून हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

माहूर येथे विविध धार्मिक यात्रा व उत्सवांच्या निमित्ताने लाखो भाविक दाखल होत असतात. या भाविकांच्या सेवेसाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. पिण्याचे पाणी, महाप्रसाद, उपवासासाठी खिचडी आदी सेवाकार्यांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

नवरात्र उत्सव, दत्त जयंती, ईद-ए-मिलादुन्नबी, गणेश विसर्जन तसेच सरकार सोना पीर बाबा उरूस आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या काळात भाविकांच्या सुविधेसाठी दोसानी स्वतः पुढाकार घेतात. महाप्रसादाचे स्टॉल उभारून केवळ नियोजन न करता ते प्रत्यक्ष उपस्थित राहून भाविकांना प्रसादाचे वाटप करतात. त्यांच्या या आपुलकीच्या सेवाभावाचे भाविकांकडून कौतुक होत आहे.

‘भाविकांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेतून नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचे सेवाकार्य सुरू असून, सामाजिक सलोखा आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

मान्यवरांची उपस्थिती

महाप्रसादाच्या उपक्रमावेळी उपनगराध्यक्ष नाना भाऊ लाड, नगरपालिका अकाउंटंट मरेवाड साहेब, ओ.एस. गजलवाड साहेब, नगरसेविका प्रतिनिधी आकाश कांबळे, अफसर अली, विशाल ढोरे, सुमित खडसे, पत्रकार गजानन भारती, बालाजी कोंडे, राजू ठाकूर, निलेश बनसोडे, रफिक भाई, गणेश जाधव, सुनील आडे, विजय शिंदे यांच्यासह नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button