वनविभागाच्या पथकाने कारसह 46 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

किनवट / प्रतिनिधी- गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या पथकाला पाहून लाकूड तस्कराने कार सोडून पलायन केले. संशयावरून त्याच पांढऱ्या रंगाची टाटा इंडिका कारची झडती घेतल्यानंतर त्यात साडेचार हजारांचा कटसाईज सागी लाकूड आढळून आले. 40,000 हजाराच्या कारसह 46,616 रुपयाचा मुद्देमाल वनविभागाच्या हाती लागला. आज (15 जून) दुपारी गोकुंद्रातील ईदगाह रोड दरम्यान ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलेवन विभागाचे पथक कर्तव्यावर असतांना पथकाला बघुन गोकुंदातील ईदगाह रोडवर टाटा इंडिका कार सोडून लाकूड तस्करासह चालकाने पळ काढला, पथकाच्यालक्षात आल्यानंतर त्या गाडीची तपासणी केली असता त्यात अवैधसागी कटसाईज 21 नग ज्याची किंमत 4.616 रुपयाचे लाकूड आढळून आले. शिवाय40,000 हजाराची कारही पथकाने जप्त करन आशात आरोपीविरुद्ध वनगुन्ह्याची नोंद करण्यात आली. नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक जीडी. गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एल. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलीचे वनपरिमंडळ अधिकारी एम.एन. कतुलवार, वनपाल एस.एम. कोम्पलवार, वनपाल एस.एम. यादव, वनरक्षक अनिल फोले, बी.एस. झंपलवाड, ओ.एन. शिंदे, व्ही एस. मुळे तसेच वाहन चालक बाळकृष्ण आवले व शेख नूर यांचा या कार्यवाहीत सहभाग असल्याचे सूत्रांनी सांगितले


