किनवट

निवडणूक निरीक्षक शैलेंद्र कुमार (भा.प्र.से.) यांनी ८३-किनवट निवडणूक कामाची केली पाहणी

लोकादेश न्यूज, किनवट : निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणुन श्री शैलेंद्र कुमार भा.प्र.से. यांनी ८३- किनवटविधानसभा मतदार संघातील निवडूक विषयक कामकाजाचा आढावा घेवून काही मार्गदर्शक सूचना केल्या. श्री शैलेंद्र कुमार यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्र. 7499127265हा आहे. Observer code-G-35602 हा आहे. ते ८३ किनवट विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. सर्व नोडल अधिकारी यांची बैठक घेवुन मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व उमेदवार यांची आदर्श आचारसंहितेबाबत बैठक घेवुन मार्गदर्शन केले. सदर बैठकीस मा. निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, किशोर यादव, अजय कुरवाडे, ना. तहसिलदार महमद रफीक, राजकुमार राठोड, रामेश्वर मुंडे हे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button