किनवट

अपूर्ण विकासाची कामे जलदगतीने करा आमदार केराम यांनी घेतली बैठक

किनवट : राज्य विधान मंडळाचे अंतिम महत्वपूर्ण अधिवेशन पुढील पंधरवड्यात सुरू होणार आहे. मतदारसंघातील विविध महत्वपूर्ण विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच सुरू असलेली विकास कामे, प्रलंबित व अपूर्ण कामांचा आढावा घेण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांची बैठक २६ जून – रोजी आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांनी सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक बोलावली होती. पंचायत समितीअंतर्गत होणाऱ्या – महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांना प्राधान्य द्या, घरकुलाची कामे प्राधान्याने करा, अशा सूचना आमदार भीमराव केराम यांनी पंचायत समितीचे  बीडीओ, नगरपालिकेचे मुख्याधिकारीयांना दिल्या. यावेळी सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मेघना कावली, तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, बीडीओ पुरुषोत्तम वैष्णव, तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, नपचे मुख्याधिकारी मुगाजी काकडे, बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड आदी उपस्थित होते.
तालुका प्रशासन लागले कामाला
विधानसभा निवडणूक जवळ आली असून त्यापूर्वी तालुक्यातील विकास कामांना गती देण्याबाबत प्रशासन कामाला लागले आहे.
किनवट तालुक्यातील अनेक प्रकल्प तसेच विकास कामे रखडली आहेत.

Related Articles

Back to top button