किनवट

किनवटसह मराठवाड्याला पाणीदार करणार-देवेंद्र फडणवीस

लोकाभिमुख योजनांसाठी आ. केराम यांना विजयी करण्याचे आवाहन

किनवट – कायम दुष्काळो भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट आणि मराठवाडयाला पाणीदार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आगामी काळात मराठवाडयाचीदुष्काळग्रस्त अशी ओळख पुसून टाकली जाईल असा विश्वास व्यक्त करीत लोकाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीसाठी किनवटकरांनी आ. भीमराव केराम यांना विजयी करावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

किनवट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ. भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलतांनाते म्हणाले की, सरकार आपलंच येणार आहे चिंता नसावी. पुढच्या पाच वर्षात विकासाचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. मराठवाड्याचा दुष्काळ या पिढीपासून भविष्यात पहायला मिळणार नाही. त्यासाठीची टेंडर प्रक्रीया झात्त्त्वाचे सांगून प्रधानमंत्र्यांनी भरपूर निधी देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले, यावेळी त्यांनी राज्यसरकारच्या लोकाभिमुख योजना मांडल्या. लाडक्या बहिणींच्या योजनेला सावत्र भावांनी बंद करण्यासाठी प्रयत्न केले ही योजना चालू ठेवण्यासाठी लाडक्या बहिनी, भावजी, भाऊ, भाच्यांनी आ. केरामांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले, किनवट हा आदिवासी जिल्ह्याची मागणी केली. रस्ते, पुलांची कामे, बारामती करायची नाही परंतु मतदारसंघाचा विकास करायचायआश्रम शाळा इमारतोंची उभारणी, आरोग्य विषयक अशा चौफेर विकास कामांची उजळणी वाचली. नगर परिषदेच्या दिडशे गाळे आणि त्यावर भव्य सभागृहाचे काम चालू असल्याचेही आवर्जून आ. केरामांनी प्रास्ताविकातून सांगितले. यावेळी व्यासपीठावर संजय कौडगे, किशोर देशमुख, संध्या राठोड, डॉ. अशोक सुर्यवंशी, महंत शामबापू महाराज, धरमसींग राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भाजापाचेआदिलाबादचे आमदार पायल शंकर, इंजि. प्रकाश टारपेंसह आदिंनी वेगवेगळ्या विषयांवर मनोगत व्यक्त करीत, आ. केरामांनी केलेल्या विकासकामांवर प्रकाश टाकला. या सभेला नागरीकांसह उपमुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिनींनी लक्षवेधी गदर्दी केली होती. सूत्रसंचालन किशोर देशमुख , अशोक नेम्मानिवार यांनी केले.

अन् ‘चिमट्या’ला चिमटा घेतला

विदर्भ आणि मराठवाड्याच्या सिमेवर निम्न पैनगंगा प्रकल्प अर्थात चिमटा धरण रद्द झाल्याने होणाऱ्या टीकेला उत्तर देतांना ते म्हणाले की, निम्न पैनगंगा प्रकल्प रह करुन नविन पद्धतीचे उच्चपातळी बंधारे उभारण्याचे भरीव आश्वासन देत, ‘चिमट्या’ला चिमटा घेण्याचा निर्णय घेतला असून ९५ गावच्या लोकांच्या जीवनमरनाचा म्हणजे विस्थापित होण्याचा प्रश्न मिटल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले, किनवट मतदारसंघात पैनगंगेवर उच्चपातळी बंधारे दिल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात पाणीदार बदल घडऊन आणला आहे.

Related Articles

Back to top button