किनवट विधानसभेतील उमेदवाराने केले विष प्राशन

किनवट, दि.05 (प्रतिनिधी) : किनवट विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी दिलेल्या तिकिटावर उमेदवारी दाखल केलेले मन्नेरवारलू समाजाचे गोविंद सांबन्ना जेठेवार या उमेदवाराने आज मंगळवारी (दि.05) दुपारी दीड च्या आसपास विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
जेठेवार यांना तातडीने गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे प्रथमोचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जेठेवार यांना आदिलाबाद येथे पाठविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती कशी आहे, हे अजून कळाले नसून, विष प्राशन करण्याचे कारण ही अजून समोर आलेले नाही. काल सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार न घेता निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. सर्व प्रकीयेनंतर त्यांना ‘ऑटोरिक्षा’ हे मतदानाचे चिन्ह प्राप्त झाले होते.


