किनवट

तरुणांनी सशक्त होऊन देशाचे व धर्माचे रक्षण करावे – ह.भ.प.श्री. नारायण महाराज

किनवट /महाराजांनी किनवट शहरातील सर्व मंदिरांना स्वतः भेट देऊन सर्व मंदिर समितीची बैठक घेऊन सर्वांसोबत चर्चा करून मंदिरामध्ये धूप,दीप, नैवेद्य,आरती,स्वच्छता व धार्मिक कार्यासोबतच काही समाज उपयोगी उपक्रम सुरू करावेत असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला योग्य प्रतिसाद देत श्रीराम मंदिर रामनगर किनवट या मंदिर समिती तर्फे तरुणांसाठी व्यायाम शाळा (जिम) चालू केली असून या व्यायाम शाळेला आदरणीय श्री नारायण महाराज तेलंगणा यांनी भेट देऊन तरुणांना मार्गदर्शन केले.
आजचा तरुण व्यसनामध्ये व पाश्चात्य संस्कृतीमध्ये गुरफटत चालला असून त्यामुळे तरुणांचे शारीरिक बल,आत्मबल,मनोबल कमजोर होत चालले असल्यामुळे ते शरीराने व मनाने कमकुवत होत आहेत. त्यामुळे तरुणांनी शारीरिक बलासाठी व्यायाम व आत्मबलासाठी,मनोबलासाठी अध्यात्म यांची योग्य सांगड घातली तर तो तरुण व्यसनमुक्त होऊन आसन युक्त होऊ शकतो, सशक्त होऊन देशाचे व धर्माचे रक्षण करू शकतो निरोगी शरीरात निरोगी आत्मा वास करत असते त्यामुळे आपण निर्व्यसनी झाल्यानंतर आपल्या दोन-चार मित्रांना सुद्धा निर्व्यसनी करून त्यांना देखील देशाच्या धर्माच्या रक्षणासाठी तयार करावे आपण निर्व्यसनी होऊन चांगले राहणे हा स्वार्थ आहे व आपल्या सोबत दोन-चार मित्रांना सुद्धा निर्व्यसनी करून त्यांचे जीवन चांगले करणे हा परमार्थ आहे. असा मोलाचा संदेश देत निरोगी निर्व्यसनी व सशक्त राहून आपल्या देशाचे धर्माचे व माता भगिनीचे रक्षण करणे हे प्रत्येक तरुणाचे कर्तव्य असून ते सर्वांनी योग्य प्रकारे पार पाडण्याचे आवाहन महाराजांनी आपल्या मार्गदर्शनातून केले
यावेळी मंदिर समितीचे सर्व सदस्य परिसरातील समस्त तरुण व भाविक भक्त उपस्थित होते.

Related Articles

Back to top button