किनवट

दोन धर्मियांमध्ये जाणुनबुजुन जातीय तेढ निर्माण करुन धार्मिक कलह,द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राम गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची जमियत ए उलमा ए हिंद किनवटची मागणी.

किनवट(प्रतिनिधी) दोन धर्मियांमध्ये जाणुनबुजुन जातीय तेढ निर्माण करुन धार्मिक कलह, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करण्याची मागणी किनवटचे पोलीस नीरक्षक यांन निवेदन देऊन करण्यात आली आहे,                                        रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांनी मौजे पंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक या ठिकाणी सप्ताहा दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलीन होईल, असे जाणिवपूर्वक प्रवचन केले आहे. या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू-मुस्लिम या दोन समाजामध्ये मने कलुषित करुन जातीय तणाव, धार्मिक दवेष पसरवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.आपण समस्येचे गांभीर्य ओळखून रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट, ता.वैजापूर जि. औरंगाबाद यांच्यावर विविध कलमंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी असे निवेदन देण्यात आले या वेळी हाफिझ शर्फोद्दिन साहेब,मुफ्ती तन्वीर साहेब, मुफ्ती मो.सिद्दिक साहेब,मो शिफीओद्दिन शमशोद्दिन,मुफ्ती फिरोझ साहेब, शाहबोद्दिन चव्हान,हाफिझ मोईन साहेब, मौलाना सुलेमान साहेब,हाफिझ सुलेमान खान,शेख रफिक मौलाली आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button