हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किनवटमध्ये भाजपची आढावा बैठक

किनवट – हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नांदेड ( उत्तर) जिल्हाध्यक्ष अॅड.किशोर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दि.१३ किनवट येथील साईवंदना मंगल कार्यालयात भाजपची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार भीमराव केराम,हिंगोली लोकसभेचे सह समन्वयक सुधाकर भोयर,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.संध्या राठोड,प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक नेम्मानीवार,प्रा.किशन मिराशे,दीपक नेम्मानीवार,बाबूराव केंद्रे,सोपानराव केंद्रे,आनंद मच्छेवार,प्रफुल्ल राठोड, किनवट तालुकाध्यक्ष बालाजी आलेवार,शहराध्यक्ष संतोष चनमनवार यांच्यासह संदीप केंद्रे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा उषा धात्रक,जिल्हा सरचिटणीस भावना दीक्षित,सुरेखा घाटकर,मनीषा चौधरी,नवीन राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.उमेदवार कोणत्या पक्षाचा याचा विचार न करता भाजप पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी युती धर्म पाळून देशाच्या पंतप्रधान पदावर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार बाबूराव कोहळीकर यांच्या विजयासाठी अहोरात्र परिश्रम घ्यावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी याप्रसंगी केले.तत्पूर्वी त्यांनी बूथप्रमुख व भाजप पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत कमी कालावधी असल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हेवेदावे बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करावे,असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी यावेळी केले.सूत्रसंचालन प्रदीप एडके यांनी, तर प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी केले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.


