किनवट

रंगकर्मीच्या वतीने राज्यस्तरीय रंगभरण,चित्रकला,निबंध स्पर्धा आयोजन; जिप माळबोरगाव शाळेत सदर स्पर्धेला सुरुवात;

किनवट(प्रतिनिधी)रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर जि.लातूर यांच्या वतीने मागील १० वर्षा पासुन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव,लघुपट निर्मिती शैक्षणिक,सामाजिक,आरोग्य क्षेत्रात अविरतपणे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता बरोबरच कलात्मक व्यासपीठ देण्यासाठी रंगकर्मीच्या वतीने जिप माळबोरगाव शाळेत राज्यस्तरीय भव्य रंगभरण,चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.                                   ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उषा पवार, पदवीधर शिक्षिका क्रांती श्रीमनवार सहशिक्षक फईम खान,परमेश्वर बोडके,मारोती भोसले यांनी सहकार्य केले.तरी या स्पर्धेतकिनवट माहूर तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन,रंगकर्मीचे उपाध्यक्ष मारोती भोसले यांनी संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनेच्या शाळेतील मुख्याध्यापक तथा शिक्षक यांना केले आहे.स्पर्धेसाठी लागणारे रंगभरण, चित्रकला व निबंध लिहीण्यासाठी ड्रॉइंग पेपर शाळेच्या मागणीप्रमाणे आपल्या शाळेत प्रत्यक्ष देण्यात येणार आहे. स्पर्धेचे नियोजन शाळेच्या नियोजनानुसार शाळेतच करायचे आहे. या स्पर्धा आपल्या शाळा स्तरावर दिनांक ०१/०१/२०२५ ते २६/०१/२०२५ या दरम्यान आयोजित करावी त्यासाठी प्रति स्पर्धा/प्रती विद्यार्थी २५/- रुपये शुल्क आहे त्यापैकी प्रति विद्यार्थी २० टक्के फी शाळा स्तरावर परीक्षा नियोजनसाठी ठेऊन घ्यावी तरी आयोजक मारोती भोसले-आयोजक किनवट/माहूर मो.नं. 9422267773 यांच्याशी संपर्क साधावा.पारितोषिक वितरण ८ फेब्रुवारी २०२५ मध्ये उदगीर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.स्पर्धेसाठी गट व पारितोषिके रंगभरणसाठी-प्रथमगट LKG ते 2 री, द्वितीय गट-वर्ग 3 री ते 6 वी,तृतीय गट-7 वी ते 10 हे वर्ग असणार आहेत.चित्रकला स्पर्धेसाठी विषय -आपली राष्ट्रीय प्रतीके आणि गट प्रथमगट -वर्ग 1 ली ते 4 थी द्वितीय गट-वर्ग.5 वी ते 10 वी.तर निबंध स्पर्धा विषय संविधानाने आपणास दिलेले हक्क व अधिकार यामध्ये गट आहेत -प्रथम गट वर्ग 5 वी ते 10 वी. असे ठेवण्यात आले आहेत ,प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पारितोषीके ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम 5001 द्वितीय 3001 तृतीय 2001 रुपये उत्तेजनार्थ पारीतोषिक आकर्षक 100 परीक्षा पैड, प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक व डिजिटल स्वतंत्र सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button