किनवट

किनवट:- नव्या दिशेचे नव्या उशेचे….गीत सुर्य हे गाती…. या मंगल देशाचे आहे….भविष्य आमुच्या हाती….भविष्य आमुच्या हाती….!!!

जणू असेच काहीसे म्हणत आदिवासी,डोंगराळ किनवट माहूर तालुक्यातून महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा गुणवत्तेचा आलेख प्रतिवर्ष वाढतच गेला असून  या महाविद्यालयाने आदिवासी अतिदुर्गम भागात शैक्षणिक गुणवत्तेचा 30ते40 वर्षांपासून शैक्षणिक आलेख कायम उंचावतच ठेवला आहे.

सर्व शैक्षणिक सुविधा इंटरनेटसह,डिजिटल वर्गखोल्या, अत्याधुनिक सर्व सुख सुविधा इथे उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकुल म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोकुंदा चा चालू वर्षी इयत्ता  बारावी आणि त्यानंतर दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल या विद्यालयाचे कर्तृत्व सिद्ध करते.

नुकताच दि.27/05/2024 रोजी जाहीर झालेल्या SSC दहावी वर्गाच्या निकालात सेमी इंग्रजी माध्यमाचा 100% तर मराठी माध्यमाचा 98.78% इतका निकाल  लागला आहे.तसेच सेमी माध्यमात गणित व विज्ञान या विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण घेणारे प्रत्येकी पाच विद्यार्थी आहेत ही बाब अभिमानास्पद आहे.

सेमी माध्यम दहावीत विद्यालयाची कु.प्रिती जनार्दन दुधमल हिने 99%,कु.स्नेहल दत्ता कांबळे हिने 98.50 तर कु.शितल नामदेव चाकुरे हिने 97.80% गुण घेऊन अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.तर मराठी माध्यमातून कु.प्रतिक्षा राहूल पारधे हिने 93.20%,कु.जयश्री विजय कवडे हिने 92% तर कु.कु.पल्लवी अरविंद जाधव हिने 91.60% इतकी टक्केवारी घेऊन अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या निकालाचे गमक सांगताना संस्थेचे अध्यक्ष अभि.प्रशांत ठमके म्हणतात की,इथे दरमहा युनिट टेस्ट घेतली जाते, परीक्षेवर अंतिम फीडबॅक घेतल्या जातो. पालकांना देखील आपल्या पाल्यांचा परीक्षेतील गुणदान विषयी सविस्तर माहिती दिल्या जाते  तसेच मेहनती शिक्षकांकवृदांकडून वर्गातच सर्व बाबींचा सराव करून घेतल्या जातो.

अगदी तन्मयतेने आणि प्रामाणिकपणे सर्व मार्गदर्शक आपापली जबाबदारी पार पाडतात  तेव्हाच या संस्थेतील गोरगरीब,कष्टकरी व सामान्य कुटूंबातील मुले आजच्या स्पर्धेच्या युगातील सर्वंकष विद्यार्थी म्हणून चमकत आहेत.

आज नावारूपाला आलेले शैक्षणिक संकुल म्हणजेच ‘महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय गोकुंदा येथे मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभि.प्रशांत ठमके व सचिव प्राचार्या शुभांगीताई ठमके हे पूर्ण वेळ विद्यार्थ्या समवेत राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करतात व त्यांना प्रेरणा व प्रबलन देतात हे या ठिकाणी विशेष बाब म्हणावी लागेल तसेच

गरीब व होत करू विद्यार्थ्यासाठी विशेष वर्ग व जादा तासिकेचे आयोजन देखील केले जाते.विद्यालयाच्या दहावीच्या  निकालातील या उंच भरारीसाठी मार्गदर्शक,गुणवंत विद्यार्थी व संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Back to top button