किनवट

किनवट पालिकेत मुख्याधिकारी अजय कुरवाडे रूजू ; साडेतीन वर्षानंतर प्रभारीराज संपुष्टात

 

किनवट – येथील नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी अजय कुरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून,कुरवाडे यांनी शुक्रवारी दि. ११ किनवट पालिकेचा पदभार स्वीकारला आहे.   

पेसातंर्गत असलेल्या किनवट पालिकेला गेल्या साडेतीन वर्षांपासून कायमस्वरुपी मुख्याधिकारी नव्हते.यामुळे प्रभारीराजच सुरु होता.सततच्या मागणीनंतर प्रशासनाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांचे सत्र सुरु केले आहे.दि.२ सप्टेंबर रोजी शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी किनवट पालिकेसाठी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथील मुख्याधिकारी दादाराव डोल्हारीकर यांच्या नियुक्तीचे आदेश दिले होते.परंतु,ही बदली मान्य नसल्याने डोल्हारीकर यांनी दि.५ सप्टें.रोजी ‘ मॅट’ कडे धाव घेतली.त्यानंतर त्यांच्या बदलीला पुढील आदेशापर्यंत मॅटकडून स्थगिती देण्यात आली होती.मॅटच्या आदेशाला आव्हान देत डोल्हारीकर यांनी उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले.न्यायालयाने त्यांच्या बदलीवर कायम स्थगिती दिली.या घडामोडींनंतर गुरुवारी दि.१० शासनाच्या अवर सचिवांनी किनवट पालिकेसाठी अजय कुरवाडे यांची नेमणूक केली.त्यानुसार कुरवाडे यांनी शुक्रवारी किनवट पालिकेचा पदभार स्वीकारला.स्थानिक कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.तर प्रभारी मुख्याधिकारी मुगाजी काकडे यांनीही त्यांना शुभेच्छा देवून गेल्या ८ महिन्यात पालिका कर्मचाऱ्यांसह माजी पदाधिकारी,नगरसेवकांसह नागरिकांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button