किनवट
किनवट – राज्य विधानमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर किनवट – माहूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्याच्यादृष्टीने बुधवारी दि.२६ तहसील कार्यालयात आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली
किनवट – राज्य विधानमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर किनवट – माहूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्याच्यादृष्टीने बुधवारी दि.२६ तहसील कार्यालयात आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली,तहसीलदार शारदा चौंडेकर,मुख्याधिकारी मुंजाजी काकडे यांच्यासह किनवट,माहूर तालुक्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. चालू विकासकामे वेळेत व दर्जेदार करण्याची सूचना आ. केराम यांनी याप्रसंगी केली.


