पोलीस,वन,प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त कारवाईत ८ लाखांचे सागवान जप्त
तस्करांच्या हल्ल्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह कर्मचारी जखमी ; सिंदखेड ठाण्याची गाडी फोडली
किनवट – पोलीस प्रशासन,वनविभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी दि.३१ रोजी सागवान तस्करीचे केंद्रबिंदू असलेल्या किनवट तालुक्याच्या चिखली ( बु.) गावातून ७ ते ८ लाखांचे २०० घनफूट सागवान लाकडे जप्त केली.कारवाईला विरोध करत तस्करांनी केलेल्या हल्ल्यात माहूरच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह इतर ८ कर्मचारी जखमी झाले. चिखली बु.गावात नेहमीच सागवानी लाकडांची तस्करी होते.शुक्रवारी पहाटे ५ च्या दरम्यान वरील तिन्ही विभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी चिखली गावात धाड टाकली.त्यावेळी अवैधरित्या सागवान झाडांची कत्तल करून लाकडे साठवून ठेवल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.जवळपास ८ लाख रूपये किंमतीची २५० घनफूट सागवान लाकडे जप्त करण्याची कारवाई सुरू असताना २५ ते ३० जणांनी कारवाईत अडथळा आणत दगडफेक केली.दगडफेकीत माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहीत जाधव यांचे डोके फुटले.तर इतर ७ ते ८ कर्मचारी किरकोळ जखमी झाले.हल्लेखोरांनी सिंदखेड पोलीस ठाण्याच्या जीपवर दगडफेक करीत २० हजाराचे नुकसान केले.दगडफेकप्रकरणी चिखली वनपरिमंडळाचे वनपाल मनोहर कत्तुलवार यांच्या फिर्यादीवरून किनवट पोलिसांनी चिखली येथील शेख अजु शेख उस्मान, शेख रफीक शेख उस्मान, शेख सलमान शेख महेबुब,शेख खैरू शेख नबी,शेख शम्मी शेख शम्मु, शेख मौसीन शेख मुस्तफा,शेख पाशा शेख साब,शेख महेबुब शेख तालाब,शेख रफीक शेख उस्मान,शेख जाफर शेख फारुख, शेख जाफर नजु गौरानी, शेख फारुख शेख कुर्बान,शेख अकलास शेख खदीर, शेख अफरोज शेख कुर्बान,शेख शहीद शेख मुस्तु,शेख आजीम शेख औनक,शेख अफरोज शेख खाजा,शेख आजीम शेख जैनुल,शेख नजर शेख जाफर,शेख इरफान शेख मुस्तुक याच्यासह इतर ८ ते १० अज्ञातांवर गुन्हे दाखल केले.सदर धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार,उपवनसंरक्षक केशव बावळे,बी.एम.स्वामी यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे यांच्यासह इतरांनी यशस्वी केली.यापूर्वी सन २०१९ मध्ये तत्कालिन उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्चा मार्गदर्शनात ‘ऑपरेशन ब्ल्यू मून ‘कारवाईत १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.त्यानंतरची मोठी कारवाई होय.



