किनवट

किनवट येथे भारतीय डाक विभागाचा डाक चौपाल कार्यक्रम संपन्न

किनवट : दि.२-ऑगस्ट रोजी किनवट येथे भारतीय डाक विभागाचा डाक चौपाळ कार्यक्रमा अंतर्गत भारतीय डाक विभागाच्या विविध योजनांच्या नागरिकांना लाभार्थ्यांना परिचय व्हावा तसेच डाक विभागाच्या विविध योजनेचा लाभार्थ्यांनाफायदा व्हावा यासाठी चोपाळ ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधव बारस्कर (उप विभागीय डाक निरीक्षक किनवट) तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे तालुका सचिव बालाजी पाटील सिरसाट हे उपस्थित होते.
यावेळी पत्रकार बालाजी सिरसाट यांनी उपस्थित लाभार्थ्यांना पोस्टाचे बचत बँक खाते (सेविंग खाते) लेक लाडकी व लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभदायक व खाते उघडण्यासाठी गावोगावी डाक विभाग सज्ज असल्याचे लाभार्थ्यांना  डाक विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती देत कर्मचारी बांधवांना फिल्डवर काम करत असताना पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तर टपाल खात्याकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची सेवासुविधांची माहिती देण्यात आली.सदर कार्यक्रमात माधव बारस्कर डाक निरीक्षक किनवट यांनी डाक विभागाच्या बचत बँक योजना, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना, टाइम डीपोसीट, आवर्ती ठेव योजना, जेष्ठ नागरिक योजना तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा, अपघाती विमा अश्या विविध योजनांची माहिती दिली. शासन मार्फत राबविण्यात येत असलेल्या लेक लाडकी व लाडकी बहिण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस बचत बँक खाते काढण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.तसेच शासनामार्फत येणाऱ्या सर्व प्रकारचे अनुदान हे बचत बँक खात्यात जमा होत असल्याचे यावेळी सांगितले.पोस्ट ऑफिस मार्फत आता कॉमन सर्विस सेंटर द्वारे नागरिकांचे पनकार्ड, आधार कार्ड अपडेट, फसल विमा योजना या सुविधा मिळत आहेत. रक्षाबंधन निमित्त पोस्टात राखी कव्हर विक्री साठी उपलब्ध आधी योजनेची माहिती देण्यात आली.
यावेळी नारायण दराडे पाटील, (माजी पंचायत समिती सभापती) डाक विभागाचे अनिल भोसीकर मनोज भुरके डाक विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी लाभार्थी तसेच कन्यका परमेश्वरी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैभव मोरे,संजय मेश्राम, शिवाजी पंदे यांच्यासह डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित चव्हाण यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार  बाबाराव फाजगे यांनी मानले.

Related Articles

Back to top button