किनवट

किनवट तालुक्यातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या अशिर्वादाने मी आज आमदार व नामदार झालो. संपूर्ण महाराष्ट्र हे माझ कार्यक्षेत्र ना. हेमंत पाटील

किनवट (ता.प्र.) तालुक्यातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या अशिर्वादाने मी आज आमदार व नामदार झालो. संपूर्ण महाराष्ट्र हे माझ कार्यक्षेत्र आहे . खासदार असताना तालुक्यातील अनेक विकासाची कामे केली बंधारे बांधून जवळपास १ लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली अनण्याचे भाग्य मला मिळाले .या पुढे ही किनवट च्या जनतेला विसरणार नाही. कोणतेही विकासात्मक कामे , किंवा  कोणत्याही समस्या असुदयात माझ्या पर्यंत आल्यास नक्कीच त्या समस्या सोडवेन असे आश्वासन किनवट करांकडून आयोजित सत्कार  सोहळ्यातील सत्कार मुर्ती ना. हेमंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले .
 हेमंत पाटील यांची विधान परिषदेच्या आमदार पदी निवड झाल्याने व राज्य मंत्र्याचा दर्जा असलेले पद मिळाल्या पासुन प्रथमच किनवट शहरात येत असल्याने त्यांच्या भव्य सत्कार सोहळयाचा कार्यक्रम साई वंदना मंगल कार्यालय किनवट येथे दिनांक १९ ऑक्टोंबर २०२४ शिवसेना ( शिंदे ) गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता .या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते .  तसेच किनवट शहरात सुद्धा अनेक ठिकाणी फटाक्याची अतिषबाजी करत मोठे जंगी स्वागत केले. साईवंदना मंगल कार्यालयात मुख्य सत्कार सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या उत्सात घेण्यात आला .  त्यांचा या वेळी भव्य सत्कार करण्यात आला . शेकडो शिवसेना ( शिंदे गटा) चे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच त्यांच्याशी चांगले संबंध असणारे त्यांना मानणारे इतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना  विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे .
किनवट विधानसभा मतदार संघ  आमच्या पक्षाला न सुटता मित्र पक्षाला सुटली तर आम्ही त्यांचा ही प्रचार करून ती सीट  निवडून आनू असा विश्वास पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. रेल्वेच्या काही समस्या मांडल्या असता काही वेळानी रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलुन समशा सोडवू असे असे अश्वासीत केले .
 त्यांच्या सोबत  अनेक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Back to top button