किनवट

वंजारवाडी येथे श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हर्षोल्हासात

किनवट,दि. 29 (प्रतिनिधी) :  किनवट येथून पूर्वेस  अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात  वसलेल्या मौजे वंजारवाडी येथे लोकसहभागातून चिरंजीवी श्रीरामभक्त मारुतिरायाच्या नूतन मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून, गुरूवारी (दि.26) सकाळी 11:21 च्या शुभमुहूर्तावर श्री महाबली संकटमोचक हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहणाचा सोहळा मदनापूर येथील सोमेश्वर संस्थानचे ह.भ.प. बालयोगी गंगेश्वर महाराज यांच्या हस्ते शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हर्षोल्हासात पार पडला.

  हरि भक्त परायण नारायण महाराज  माधापूरकर  यांच्या प्रेरणेने गावकऱ्यांनी स्वखर्चातून परिश्रम व चिकाटीने श्री हनुमानाचे भव्य  मंदिर उभे केले.  तत्पूर्वी सकाळी सात वाजता पवित्र कलशासह  भजने गात टाळमृदंगाच्या गजरात ‘दिंडी’ काढून ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. या महोत्सवासाठी गावातील लेकबाळींनीही मोलाचे योगदान दिले म्हणून ग्रामस्थांच्यावतीने या सर्वांना भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सर्व उपक्रमांचे नियोजन गावातील दत्ता गोविंदराव केंद्रे यांनी केले होते. वेदमंत्रांच्या घोषात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहनाचा विधी झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले होते. भक्तिरसात डुंबून अपार आनंदात पार पडलेल्या या सोहळ्याचा लाभ पंचक्रोशातील शेकडो भाविक भक्त आणि महिलांनी घेतला.

           सध्या गावामध्ये गत शनिवारपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून शनिवारी (दि.28) काल्याच्या कीर्तनाने याची सांगता होईल. सदर मंदिर गावकऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने उभारले असून,  यात शंकर जायभाये, सूर्यकांत गुट्टे, परमेश्वर जायभाये ,बाबुराव गुट्टे, ज्ञानदेव मुंडे, माधव चाटे, पुंडलिक घुगे, रामदास गुट्टे, बालाजी जायभाये, केशव केंद्रे , हरिचंद्र जायभाये , उध्दव गुट्टे, सुधाकर अनंतवार यांचेसह संपूर्ण गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

Related Articles

Back to top button