किनवट

कोलकाता घटनेच्या निषेधार्थ कँडल मार्च

किनवट – कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कारानंतर त्यांची निर्दयीपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दि.१६ किनवटच्या गोकुंदा येथे महिलांनी कँडल मार्च काढला.
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या सुचेनुसार व नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षा संध्या राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस भावना दीक्षित व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी कँडल मार्चचे आयोजन केले होते.गोकुंद्याच्या दत्तनगर ते स्व.बाळासाहेब ठाकरे चौकापर्यंत काढलेल्या कँडल मार्चमध्ये जिल्हा सचिव करिश्मा भगत ,डॉ.अनुराधा उपासनी , डॉ.सौ. घडसिंह डॉ.वंदना पत्की ,डॉ. सुंकरवार, जाधव , स्वाती राव ,धावाले यांच्यासह किनवट व गोकुंदा येथील महिला,विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कँडल मार्चनंतर महिलांनी महिला डॉक्टरच्या मारेकऱ्यांना त्वरित फासावर लटकविण्याची मागणी केली.दरम्यान,याच घटनेच्या निषेधार्थ किनवट डॉक्टर्स असोसिएशनने शनिवारी दि.१७ दवाखाने बंद ठेवून मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Back to top button