Uncategorized

किनवटमध्ये ९ बटुंचे सामूहिक उपनयन संस्कार

किनवट – अ.भा.ब्राह्मण महासंघ शाखा किनवटच्यावतीने शुक्रवारी दि.२ आयोजित तिसऱ्या सामूहिक उपनयन संस्कार सोहळ्यात विविध ठिकाणच्या ९ बटुंवर उपनयन संस्कार करण्यात आले.                                                किनवट – नांदेड रस्त्यावरील श्री.गजानन महाराज मंदिर संस्थानच्या सभागृहात आयोजित उपनयन संस्कार सोहळ्यास आमदार भीमराव केराम,अ.भा.ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर,गंगेश्वर महाराज मदनापूरकर,भाजप नेते सुधाकर भोयर, माजी नगराध्यक्ष दिनकरराव चाडावार,व्यंकटराव नेम्मानीवार,गंगन्ना नेम्मानीवार,के.मूर्ती,आनंद मच्छेवार,अशोक नेम्मानीवार,साहेबराव पवार गुरू स्वामी, श्रीनिवास नेम्मानीवार, अभय महाजन,मुकुंद लोखंडे,स्वागत आयनेनीवार,उमाकांत कऱ्हाळे पाटील,काँग्रेसचे शहराध्यक्ष गिरीश नेम्मानीवार,सतीश बिराजदार,अमृत योजनेचे समन्वयक अनिल डोईफोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.भागवताचार्य वेदमूर्ती दिनेश गुरु कुलकर्णी संभाजीनगरकर यांच्या मार्गदर्शनात पवनगुरु बोराळकर,सार्थक पत्की,बंडू महाराज जोशी, ऋषिकेश जोशी यांच्या पौराहित्यात बंटूवर उपनयन संस्कार करण्यात आले.याप्रसंगी मार्गदर्शन करताना दिनेश गुरू कुलकर्णी म्हणाले की,सोळा संस्कारांपैकी उपनयन संस्कार हा ब्राह्मण समाजाचा महत्त्वाचा संस्कार होय.उपनयन संस्कारामुळे बटूला खऱ्या अर्थाने ब्राह्मणत्व प्राप्त होते.या संस्कारामुळे आत्मज्ञानासोबतच जबाबदारीची जाणीव प्राप्त होते.उपनयन संस्कारामुळे ब्रह्मचर्य,शिस्तबद्ध जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.वेद,धार्मिक विधींमध्ये भाग घेण्याचा अधिकार प्राप्त होतो.कुठलेही धार्मिक कार्य करताना अनंत अडचणी येतात.अडचणींचा सामना करीत किनवटच्या ब्राह्मण महासंघाकडून हे पुण्यकार्य सुरू असल्याचे सांगून त्यांनी एकंदर नियोजनाचे कौतुक केले.समाज कार्यात सक्रिय सहभाग नोंदविलेल्या ब्रह्मवृंदांचा प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी स्मृतीचिन्ह देवून गौरव केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. मार्तंड कुलकर्णी व प्रा.तपनकुमार मिश्रा यांनी केले.समाजाचे अध्यक्ष आशिष देशपांडे,मेळावा समितीचे अध्यक्ष राजेश्वर जोशी यांनी आभार मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व समाजबांधवांनी प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button