Uncategorized

गोदावरी अर्बनच्या उपाध्यक्ष हेमलता देसले यांचा उत्कृष्ट उपाध्यक्ष पुरस्काराने गौरव

  नांदेड   महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित अंतर्गत सहकार उद्यमीच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व जागतिक महिलादिना निमित्त सक्षम महिला सक्षम सहकारच्या वतीने गोदावरी अर्बनच्या उपाध्यक्ष हेमलता देसले यांना “उत्कृष्ट उपाध्यक्ष” तर शिवधाराच्या महिला नागरी पतसंस्थेच्या सचिव नीता कटकमवार यांना “उत्कृष्ट सचिव”पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार सोहळा आयोजन शिर्डी येथे संपन्न झाला.या पुरस्कार सोहळ्याचे वितरण महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सुहासिनी कोयटे,अंजली पाटील,विद्या काळे,आशा मिस्कीन,दादाराव तुपकर,अनिल येवले,भास्कर बांगर,सुरेखा लवांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सहकार उद्यमीच्या वतीने संस्थेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांकरिता देखिल पुरस्कार प्रदान करण्यात आले.यामध्ये उत्कृष्ट उपव्यवस्थापक म्हणून संस्थेचे मुंबई शाखेतील स्वरूपाली नेरुळकर तर
उत्कृष्ट सहाय्यक व्यवस्थापक म्हणून मुख्यालयाच्या राजिंदरकौर करमजीतसिंघ खैरा
उत्कृष्ट सहाय्यक व्यवस्थापक म्हणून अमरावती शाखेच्या कीर्ती देशमुख,उत्कृष्ट सहाय्यक व्यवस्थापक म्हणून यवतमाळ शाखेच्या आरती किटे तर उत्कृष्ट आवर्त ठेव प्रतिनिधी म्हणून ढानकी शाखेच्या आशा कलाने यांना सन्मानित करण्यात आले.

सहकार उद्यमिच्या वतीने राज्यभरातील सर्व सहकारी संस्थेमध्ये पुरस्कार निवड समितीने अत्यंत काटेकोर पद्धतीने सर्व कार्याची माहिती घेऊन हे पुरस्कार जाहीर केले आहेत.

या पुरस्कारा बदल संस्थेचे संस्थापक नामदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील,व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर व समस्त संचालक मंडळानी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button