उत्कृष्ट केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून किनवटचे इम्रान करीम खान यांचा नवी दिल्लीत सन्मान

किनवट प्रतिनिधी : जवाहेरुल उलूम उर्दू माध्यमिक विद्यालय चे सहशिक्षक आणि निवडणूक विभागात 83 किनवट विधानसभा मतदार संघातील यादी भाग क्रमांक 181चे केंद्रस्तरीय अधिकारी इम्रान करीम खान यांचा उत्कृष्ट बि.एल.ओ म्हणून नवी दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था अर्थात IIIDEM नवी दिल्ली येथे सन्मान करण्यात आला.भारत निवडणूक आयोगाच्या वतीने 12 13 जून रोजीमहाराष्ट्र,आंध्रप्रदेश,कर्नाटक आणि उडीसा या राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांसाठी नवी दिल्लीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.यात काही जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी,तहसीलदार,नायब तहसीलदार आणि बीएलओ अधिकारी सहभागी झाले होते.महाराष्ट्रातून एकूण 132 B.L.O अधिकारी या प्रशिक्षणात विविध जिल्ह्यातून उपस्थित होते. या प्रशिक्षणात किनवट नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना इमरान खान यांनी BLO अँप अधिक सुलभ व प्रभावी करण्याबाबत तसेच नवीन नाव नोंदणी करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सल्ला दिल्या. या सल्ल्याची दखल माननीय भारत निवडणूक आयोग यांनी घेतली व ईम्रान खान यांच्या शॉर्ट व्हिडिओ स्वतः माननीय भारत निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवरून प्रसिद्ध केले.राज्याचे सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी श्री किरण शार्दुल यांच्या हस्ते इम्रान खान यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.दिल्ली येथील गौरव करण्यात आल्याबद्दल इमरान खान यांचे किनवट तहसील तर्फे अभिनंदन करण्यात आले.या प्रशिक्षण कार्यक्रमात मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री संदीप कुमार अपार यांनी मास्टर ट्रेनर म्हणून उपस्थितांना प्रशिक्षण दिले.केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाचे इतर अधिकारीयांनी टप्प्या टप्प्यात मार्गदर्शन केले.सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विवेक जोशी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त हे उपस्थित होते.नवी दिल्लीत इम्रान खान यांचा सन्मान झाल्या बद्दल जवाहेरूल उलूम उर्दू शाळेचे अध्यक्ष ईसा खान सरदार खान,मुख्याध्यापिका असमा खातून व मित्र परिवार कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.



