Uncategorized

गोदावरी अर्बनचे स्थानिक सल्लागार समिती सदस्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव * अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या हस्ते सल्लागार समिती बोर्डाचे अनावरण संपन्न

नांदेड : गोदावरी अर्बनच्या आखाडा बाळापूर येथील शाखेच्या स्थानिक सल्लागार समितीची  स्थापना करून संस्थेच्या अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देऊन सत्कार सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी उपस्थिताशी संवाद साधताना म्हणाल्या की, संस्था गेल्या एक दशकापासून अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम करीत आहे. संस्थेचा पाच राज्यात हा कार्यविस्तार व 4500 कोटींचा व्यवसाय असून संस्था रिझर्व्ह बँकेच्या सर्व आदर्श निकषांचे पालन करून कामकाज करीत आहे. स्थानिक सल्लागार समितीची येथून पुढे मोठी जबाबदारी असेल कारण त्यांना ग्राहक व संस्थेचा मधला दुवा म्हणून काम करायचे आहे. त्या कार्यासाठी त्यांनी सर्व समितीच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

आखाडा बाळापूर येथील गोदावरी अर्बनची शाखा गेली एक वर्षापासून कार्यरत असून योग्यरीत्या ग्राहकसेवा देत जास्तीत जास्त लोकांपर्यंत उत्तम पद्धतीने संस्थेचे कामकाज सुरू आहे. संस्था सर्व जात धर्म पंथ पक्ष यापलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण समाजाच्या प्रत्येक योग्य गरजवंताच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे या भावनेने कार्य करीत आहे, आणि तोच निकष हा स्थानिक सल्लागार समिती निवडीमागे लावला जातो. संस्थेच्या सध्या पाच राज्यात शंभरहून अधिक शाखा आहेत. या प्रत्येक शाखेत त्या भागातील स्थानिक नागरिकांचा सहभाग असावा आणि शाखेला स्थानिक नागरिकांची मदत व मार्गदर्शन व्हावे या करिता स्थानिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात येते.

बाळापूर येथील स्थानिक सल्लागार समितीमध्ये राजेंद्रप्रसाद (राजूसेठ) अग्रवाल, विलास अमिलकंठवार, शहाजी सूर्यवंशी, डॉ.संतोष बोंढारे, विनोद बोंढारे, मोहमद्द जिया उस्मान कुरेशी, डॉ.उमेश दुर्गे, रोहित गोयंका, चंद्रकिशोर घोडगे, प्रवीण दमकोंडवार, सचिन पेंढारकर, सुनील अमिलकंठवार, बापूराव हेंद्रे या सर्व सदस्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार सन्मान करण्यात आला. या समितीमध्ये समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे समावेश करण्यात आला आहे.

याप्रसंगी संस्थेचे सचिव अँड.रविंद्र रगटे, उप सरव्यवस्थापक विजय शिरमेवार, विपणन अधिकारी महेश केंद्रे, हिंगोली शाखा व्यवस्थापक प्रदीप देशपांडे, अर्धापूर शाखाधिकारी सोमेश सांगेवार, बाळापूर शाखाधिकारी पांडुरंग कदम, गोपाल जाधव, गजानन सूर्यवंशी, जय देशमुख,ओमकार विठ्ठलकर, आकांक्षा कोरके, शाम हेंद्रे, कल्याण उपस्थित होते.

Related Articles

Back to top button