पक्षाने संधी दिल्यास मांडवा पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक – सुजाता व्यंकट तोटावार

किनवट (प्रतिनिधी): पंचायत समिती आरक्षण सोडतील मांडवा (कि) गण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या गणातून निवडणुकीचे समीकरण नव्या दिशेने वळले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधील सक्रिय कार्यकर्त्या आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. सुजाता व्यंकट तोटावार यांनी पक्षाकडून संधी मिळाल्यास मांडवा गणातून निवडणूक लढवण्याचा आपला निर्धार व्यक्त केला आहे.
सौ. सुजाता व्यंकट तोटावार भाजपमधील तज्ज्ञ कार्यकर्त्या असून त्या तालुक्यातील चर्चित मांडवा ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य आहेत. त्या उच्चशिक्षित असून ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता तसेच शेतकरी आणि महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत आहेत. जनतेशी त्यांचा दृढ संबंध असून, मांडवा ग्रामपंचायतमध्ये दोन्ही वार्डात सर्वाधिक मताधिक्य मिळवून बहुमताने विजयी झाल्या होत्या.
सौ. सुजाता यांच्या मते, जनतेची पूर्ण साथ आणि अनुभव लक्षात घेता, पक्षाने पंचायत समिती मांडवा गणातून संधी दिल्यास त्या चांगल्या मताधिक्याने निवडून येण्यास सक्षम आहेत.



