Uncategorized

पत्रकार अभिषेक बकेवाड यांच्या चिमुकल्याचे ‘सर्वज्ञ’ नामकरण!

काहाळा येथे नामकरण सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

हिमायतनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अभिषेक बकेवाड यांच्या द्वितीय पुत्राचा नामकरण सोहळा काहाळा येथे कुटुंबीय, नातेवाईक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी चिमुकल्याचे नाव ‘सर्वज्ञ’ असे ठेवण्यात आले.

गोल्ला-गोलेवार यादव समाजाचे अभ्यासक तथा लेखक साईरामजी क्यातमवार सर (देगलूरकर) यांनी चिमुकल्यासाठी ‘सर्वज्ञ’ हे अर्थपूर्ण व ज्ञानाचे प्रतीक असलेले नाव सुचविले. बकेवाड परिवाराने त्यांच्या या सूचनेचा आनंदाने स्वीकार केला.

या सोहळ्याला नांदेड जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड, साईरामजी क्यातमवार, सुभाषराव शिल्लेवाड, हिमायतनगर तालुकाध्यक्ष बाबारावजी जरगेवाड, मधुकर मिरगुलवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बाबारावजी जरगेवाड यांनी ‘सर्वज्ञ’ हे नाव चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्याची नवी ओळख ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी चिमुकल्या सर्वज्ञला आशीर्वाद देत बकेवाड परिवाराचे अभिनंदन केले. सोहळ्यामुळे बकेवाड परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Back to top button