Uncategorized

किनवटमध्ये डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात गुन्हा; मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह चालक-मालकावर कारवाई

किनवट – गोकुंदा येथील शाहूनगर परिसरात नवरात्र विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच डीजे चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 गोकुंद्याच्या शाहूनगर परिसरातील दुर्गादेवी मंडळाच्या मिरवणुकीत गुरुवारी दि.२२ सायंकाळी लाल रंगाच्या स्वराज ७४४ एक्सटी ट्रॅक्टरवर बसविलेल्या डीजेचा मोठ्या आवाजात वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी डेसिबल मीटरद्वारे आवाजाची मोजणी केली असता, ध्वनीची पातळी ७५ डेसिबलपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. त्यानंतर डेसिबल मीटरची प्रिंट काढून पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला.
याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष दीपक नागरगोजे, मंडळाशी संबंधित पदाधिकारी तसेच डीजे चालक व मालक सचिन शिवणकर (रा. किनवट) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे आणि पर्यावरण संरक्षण व ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button