Uncategorized

“संदेश केराम यांच्या प्रयत्नांना यश; कॅन्सरग्रस्त रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाखांची मदत”

मुंबई : शब्बीर शेख, रा. वडसा, ता. माहूर, जि. नांदेड या कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. ही मदत मिळवून देण्यासाठी संदेश भाऊ केराम यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. रुग्णाला तातडीने उपचारासाठी मदत मिळावी यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले.

या मदतीनंतरही संबंधित रुग्णासाठी आवश्यक ती आणखी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे संदेश भाऊ केराम यांनी सांगितले.

मदत मिळाल्याबद्दल रुग्णाच्या नातेवाइकांनी आमदार भीमराव केराम यांच्या वैद्यकीय मदत कक्ष, किनवट येथे भेट देऊन आमदार भीमराव केराम, संदेश भाऊ केराम आणि आरोग्यदूत अमन कुंडगीर यांचे आभार मानले. संदेश भाऊ केराम सोशल फाउंडेशन

Related Articles

Back to top button