Uncategorized

किनवट-अमरावती विशेष बससेवा आजपासून सुरू

उनकेश्वर, घाटंजी, यवतमाळ, नेर मार्गे प्रवासाची सुविधा; दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

किनवट : दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन किनवट आगारातर्फे किनवट ते अमरावती विशेष बससेवा आज, 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येत आहे. उनकेश्वर, पारवा, घाटंजी, यवतमाळ, नेर, नांदगाव खंडेश्वर व धानोरा गुरव मार्गे ही बस धावणार असल्याची माहिती वाहतूक निरीक्षक सटलावार यांनी दिली.

श्रीक्षेत्र उनकेश्वर हा प्रवाशांची मोठी वर्दळ असलेला मार्ग असून, दिवाळीच्या काळात या मार्गावर लांब पल्ल्याच्या अतिरिक्त बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी विनोद डवले यांनी 28 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई, तसेच नांदेड, यवतमाळ व चंद्रपूर विभाग नियंत्रक आणि संबंधित आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली होती.

या मागणीची दखल घेत किनवट आगाराने किनवट-अमरावती विशेष बससेवा सुरू केली आहे. ही बस किनवट येथून सकाळी 7 वाजता सुटून सकाळी 10.30 वाजता यवतमाळ आणि दुपारी 1 वाजता अमरावती येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी अमरावती येथून दुपारी 1.30 वाजता बस सुटेल. यवतमाळ येथून सायंकाळी 4 वाजता किनवटकडे प्रस्थान करून सायंकाळी 7.30 वाजता किनवट येथे पोहोचेल.

या विशेष बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button