Uncategorized

गोदावरी दिवाळी महोत्सवात महिला उद्योजकांना तुफान प्रतिसाद

नांदेड :  गोदावरी फाऊंडेशन संचलित ‘उद्यमी ग्लोबल’च्या वतीने महिला उद्योजकांसाठी वर्षभर विविध उपक्रम व व्यासपीठे उपलब्ध करून दिली जातात. याच उपक्रमांचा भाग म्हणून सहकारसूर्य मुख्यालयाच्या समोरील प्रांगणात आयोजित ‘गोदावरी दिवाळी फराळ व विविध साहित्य विक्री प्रदर्शना’ला ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिला. उद्यमी ग्लोबलच्या सर्व महिला उद्योजकांनी या प्रदर्शनात थेट सहभाग नोंदवत दिवाळी फराळ व सणासुदीच्या साहित्याची मोठी विक्री केली, ज्यातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठे बळ मिळाले.
प्रदर्शनाचे उद्घाटन कमलताई श्रीराम पाटील, हरमिंदरकौर गिल,यांच्या हस्ते संपन्न झाले. दिवसभरात शेकडो नागरिकांनी भेट देऊन चवदार, दर्जेदार व पारंपरिक दिवाळी फराळासह आकाशकंदील,पणत्या आणि सजावटीच्या साहित्याची खरेदी केली.
जागेवरच ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ची विशेष सुविधा
महिलांच्या व्यवसायाला अधिकृत ओळख व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी संस्थेच्या वतीने प्रदर्शनाच्या ठिकाणीच मोफत ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ करून देण्यात आले. या उपक्रमामुळे सहभागी महिला उद्योजकांनी आनंद व्यक्त करत संस्थेचे आभार मानले.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री पाटील,गोदावरी फाउंडेशनचे सचिव धनंजय तांबेकर,ॲड.रवींद्र रगटे,प्रा.सुरेश कटकमवार उद्यमी ग्लोबलच्या सदस्य कीर्ती तगडपल्लेवार,नीता कटकमवार, रेवती रगटे,प्रतिक्षा पतंगे,जसविंदरकौर सोहल,दिपाली पाटील आणि वैष्णवी पाटील उपस्थित होत्या.तसेच गोदावरी अर्बनच्या उपसरव्यवस्थापक सुरेखा दवे, सहाय्यक सरव्यवस्थापक विजय शिरमेवार, विपणन अधिकारी महेश केंद्रे, मुख्य शाखेचे व्यवस्थापक अविनाश बोचरे, डेप्युटी मॅनेजर प्रशांत कदम यांच्यासह कर्मचारी वृंद आणि उद्यमी ग्लोबलच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोदावरी फाउंडेशनच्या समन्वयीका आरती चव्हाण यांनी गोदावरी अर्बन परिवारातील सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button