Uncategorized

गोकुंद्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 12 जणांना रंगेहात पकडले!

18 हजार 840 रुपयांची रोकड आणि 52 बदकछाप पत्ते जप्त

किनवट (लोकादेश) : गोकुंदा येथील ईदगाह रोड परिसरात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर किनवट पोलिसांनी छापा टाकून 12 जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत 18 हजार 840 रुपये रोख आणि 52 बदकछाप पत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दि. 05 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.35 वाजता ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुंदा येथील ईदगाह रोडवर टिनपत्र्याच्या शेडलगत असलेल्या मोकळ्या जागेत काही जण पैसे लावून तिरट जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून 12 जणांना ताब्यात घेतले.

यामध्ये मोहमंद मुजिबोदीन मोहमद अलावुद्यीन (वय 31, रा. सरदार नगर, किनवट), रामराव गोपाळ पंतगे (वय 76, रा. कोठारी), ग्यानोबा गणपतराव झाडे (वय 69, रा. कोहीनूर नगर, गोकुंदा), संजीवन लक्ष्मणराव पाटील (वय 61, रा. समतानगर, किनवट), संजय गणपत बोटेवार (वय 46, रा. सुभाषनगर, किनवट), राजेश सोपानराव वाघमारे (वय 56, रा. ईदगाह रोड, गोकुंदा), मोहमद खान सिंकदर खान (वय 76, रा. नालागडा), राजेंद्र सुदर्शन उपलवार (वय 55, रा. रामनगर, किनवट), सिद्धार्थ गंगाराम मुनेश्वर (वय 52, रा. सिद्धार्थनगर, गोकुंदा), खंडू नागोराव ढाले (वय 38, रा. दगडवाडी, ता. हिमायतनगर, ह.मु. खरबी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), आवदुत किसन पोपुलवार (वय 47, रा. कल्याणनगर, गोकुंदा) आणि संतोष मोहन राठोड (वय 46, रा. माळबोरगाव, ता. किनवट) यांचा समावेश आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक जगदीश शिवाजी मंडलवार यांच्या फिर्यादीवरून किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 329/2026, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस अंमलदार सिरमनवार यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार मेंडके करीत आहेत.

Related Articles

Back to top button