कष्टकरी वर्गाच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान मोदींचे मोलाचे योगदान-आमदर केराम
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत टूलकिटचे वाटप; बिनव्याजी कर्जाचीही सुविधा

किनवट / प्रतिनिधी : श्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून साकार झालेली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही केवळ एक योजना नसून, कष्ट करणाऱ्या हातांना बळ देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, असे मत किनवट माहुरचे आ. भीमराव केराम यांनी व्यक्त केले.
दि.५ जून रोजी विश्वकर्मा युवा मंडळ, किनवट शाखेच्या वतीने आ. केराम यांच्या हस्ते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून लाभार्थ्यांना टूलकिट वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांना बिनव्याजी कर्जाची सुविधा देखील पंतप्रधान रोजगार योजना अंतर्गत उपलब्ध आहे. प्रास्तविकेत नेम्मानीवार यांनी सांगितले की, रही योजना केवळ साहित्य वाटपावर थांबत नाही, तर व्यावसायिक गरजा लक्षात घेता या योजनेत एक लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचीही व्यवस्था करण्यातआली आहे. भाजपा नेते सुधाकर भोयर, बिभीषण पाळदे, विश्वास कोल्हारीकर, राहुल दारगुलवार, बाळकृष्ण कदम, प्रमोद पोहरकर, राजू उठलावार, किशन कोत्तापल्लीवार, रामलू गनोजवार, संतोष इंचलवार, मुरली राईंचवार, नर्सिंग उठलावार, दत्तू कनोजवार, राकेश, बिभीषण पाळदे, विश्वास कोल्हारीकर, राहुल दारगुलवार, बाळकृष्ण कदम, प्रमोद पोहरकर, राजू उठलावार, किशन कोत्तापल्लीवार, रामलू गनोजवार, संतोष इंचलवार, मुरली राईंचवार, नर्सिंग उठलावार, दत्तू कनोजवार, राकेशयेलेशवार, प्रशांत राईचवार, राजू गनोजवार, गजू राईंचेवार, श्रीकांत राईंचवार, शुभम गणोजवार व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन साई सामनपेल्लीवार यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



